शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

वीज गायब झाली अन् मोबाईल बॅटरीच्या उजेडात जिल्हाधिकाºयांनी तपासली शेतकºयांच्या बँकेची खाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 3:31 PM

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेला आली गती

ठळक मुद्देशेतकºयांच्या खात्याची तपासणी करीत असतानाच बँकेतील वीज गेलीमोहोळचे तहसीलदार जीवन बनसोेडे यांनी आपला मोबाईल काढून बॅटरी सुरू केलीशेतकरी कर्जमुक्ती संदर्भात बँकांनी केलेल्या तयारीची माहिती घेतली

सोलापूर : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बँकांचे कामकाज कसे चालले आहे, याची खातरजमा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे मंगळवारी सायंकाळी मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेत गेल्यावर वीज गायब झाली अन् मोबाईल बॅटरीच्या उजेडात त्यांनी शेतकºयांची खाती तपासली. 

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी लाभार्थी शेतकºयांची खाती जानेवारीअखेर आधार लिंक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बँकांकडून हे कामकाज कसे चालले आहे, याची माहिती घेण्यासाठी मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी मोहोळ तालुक्याचा दौरा केला. 

लांबोटी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेला भेट दिली. बँक अधिकाºयांकडून त्यांनी लाभार्थी शेतकºयांच्या खात्याची माहिती घेतली. ही खाती आधारशी संलग्न करण्यात आली आहेत काय, याची त्यांनी खातरजमा केली. 

शेतकºयांच्या खात्याची तपासणी करीत असतानाच बँकेतील वीज गेली. त्यामुळे कामकाज थांबणार होते. मोहोळचे तहसीलदार जीवन बनसोेडे यांनी आपला मोबाईल काढून बॅटरी सुरू केली. मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडात जिल्हाधिकारी भोसले यांनी शाखा व्यवस्थापक यु. के. बागेवाडीकर यांच्याकडून दोन लाखांपर्यंतच्या थकीत कर्जदारांची यादी व त्यांचे खाते आधारशी संलग्न करण्यात आले काय, याबाबत माहिती घेतली. त्यानंतर डॉ. भोसले यांनी मोहोळ येथील भारतीय स्टेट बँक, बँक आॅफ इंडिया, महाराष्ट्र बँक, आयडीबीआय बँकेच्या शाखेस भेट दिली. या भेटीत त्यांनी शेतकरी कर्जमुक्ती संदर्भात बँकांनी केलेल्या तयारीची माहिती घेतली. 

यावेळी स्टेट बँकेचे व्यवस्थापक सचिन कसबे, बँक आॅफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक अविनाश मेकेन्ना, बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक लक्ष्मीकांत कांबळे आणि आयडीबीआयचे व्यवस्थापक मनोज दराडे यांनी माहिती दिली. याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, अग्रणी बँकेचे अधिकारी अनुराग खंडागळे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

शेतकºयांची कर्जमाफीची यादी मराठीत द्या...- कर्जमाफीसाठी बँकांनी लाभार्थी शेतकºयांची खाती आधारकार्ड क्रमांकाशी संलग्न केलेली व न केलेली यादी मराठी भाषेत तयार करावी. ही यादी बँकेच्या नोटीस बोर्डवर तसेच ग्रामपंचायतीमध्ये प्रदर्शित करावी, या यादीची प्रत तहसीलदार कार्यालय आणि सहनिबंधक कार्यालयास द्यावी असे कळविले आहे़

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयagricultureशेतीmahavitaranमहावितरणBanking Sectorबँकिंग क्षेत्र