शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

नगरसेवक विजय राऊतसह आठ जणांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: August 5, 2014 01:19 IST

नागेश अक्कलकोटे खुनीहल्ला प्रकरण

सोलापूर : बार्शी नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नागेश हरिभाऊ अक्कलकोटे (वय- ३६, रा. खुरपे बोळ, बार्शी) यांच्यावर झालेल्या खुनीहल्ला प्रकरणी बार्शी नगरपालिकेचे नगरसेवक विजय विठ्ठल राऊत, दीपक पांडुरंग राऊत यांच्यासह ८ जणांवर सोलापूर तालुका पोलिसांनी गुन्हा नोंदवून तो झीरो क्रमांकाने बार्शी शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे. दीपक ढावारी, सोनू हजगुडे, रणजित चांदणे आणि अन्य तीन अनोळखी आरोपींची नावे आहेत. १ आॅगस्ट रोजी रात्री पावणेबारा वाजता नागेश अक्कलकोटे आणि त्यांचे मित्र पंकज तुकाराम शिंदे हे दोघे गुडे यांच्या खताच्या दुकानासमोरील कट्ट्यावर गप्पा मारत थांबले होते. तेवढ्यात तीन मोटरसायकलींवरून विजय राऊत, दीपक राऊत, दीपक ढावारी, सोनू हजगुडे, रणजित चांदणे आणि अन्य तिघे अनोळखी तेथे आले. त्यावेळी आरोपींनी नागेश अक्कलकोटे यांना रस्ते कामाच्या दर्जासंदर्भात दिलेल्या तक्रारीचा आणि नगरसेवक दीपक राऊत यांचे सदस्यत्व अपात्र ठरवण्यासाठी पाठपुरावा का केला असा जाब विचारला़ आणि त्यांच्या डोक्यावर आणि शरीरावर काठ्या आणि तलवारींनी खुनीहल्ला चढवत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यात अक्कलकोटे हे रक्तबंबाळ होऊन जागेवरच कोसळले. अक्कलकोटे यांचा मित्र पंकज शिंदे यालाही बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर अक्कलकोटे यांना तातडीने उपचारासाठी सोलापूरच्या गंगामाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.------------------------------------खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हाजखमी अवस्थेत अक्कलकोटे यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद नोंदवली. यानुसार पोलिसांनी आरोपींवर तूर्त भादंवि कलम ३०२ लावले आहे. हा गुन्हा बार्शी पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असून, तपासाअंती बार्शी पोलिसांना कलमे लावण्याचा अधिकार असल्याचे तालुका पोलिसांनी स्पष्ट केले.