आठ तासांचा संघर्ष; कळशीत अडकले मांजरीचे तोंड, भूल देऊन केली सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 18:11 IST2021-07-20T18:10:54+5:302021-07-20T18:11:03+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

आठ तासांचा संघर्ष; कळशीत अडकले मांजरीचे तोंड, भूल देऊन केली सुटका
सोलापूर : राजस्व नगर येथे एका खाण्याच्या शोधात असलेल्या मांजराचे तोंड कळशीमध्ये अडकले होते. मांजरीने कळशीतून तोंड काढण्यासाठी सात ते आठ तास प्रयत्न केले. यास यश न आल्याने वन्यजीवप्रेमींनी मांजरीला भूल देऊन तीची सुटका केली.
परमेश्वर सुतार यांना मांजरीचे डोके कळशीत अडकल्याचे दिसून आले. त्यांनी इको नेचरचे अध्यक्ष मनोज देवकर यांना याची माहिती दिली. मनोज देवकर यांनी वन्यजीव प्रेमी संस्थेचे सदस्य प्रवीण जेऊरे यांना याबाबत कळविले. लगेच प्रवीण जेऊरे हे ॲनिमल राहत संस्थेचे डॉ. भीमाशंकर विजापुरे हे राजस्व नगर येथे आले.
कळशीत अडकलेल्या मांजरीला काढण्याचा प्रयत्न करत असताना तीने पायाने मारले. त्यामुळे मांजरीला काढणे शक्य नव्हते. म्हणून डॉक्टरांनी मांजरीला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. १५ मिनिटांनी मांजर बेशुद्ध झाल्यानंतर तिला अलगद बाहेर काढता आले. सध्या या मांजरीवर उपचार सुरु आहेत.