शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
4
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
5
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
6
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
7
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
8
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
11
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
12
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

लॉकडाऊनचा परिणाम; ट्रकची चाकं थांबली... रेल्वेची चाकं फिरु लागली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:30 PM

एक वाहतूक सुरु तर दुसरी बंदच : मका, गव्हाची आयात तर चादरींची रेल्वेने होतेय निर्यात

ठळक मुद्देभुसार बाजारातून दररोज ५० ट्रक मालवाहतूक व्हायची जवळपास दररोजची ३० लाखांची उलाढाल ठप्प बाजारावर अवलंबून असणारे हजार हमाल, ५०० तोलार आणि ५०० चालक-वाहक अडचणीत सापडले सोलापुरातून जवळपास ७० लाखांच्या चादरी-टॉवेलची दररोज मालट्रकच्या माध्यमातून वाहतूक होत होती. आता ती रेल्वेच्या माध्यमातून सुरू झाली

काशिनाथ वाघमारे 

सोलापूर : लॉकडाऊनला काही घटकांनी व्यवसायाची संधी मानली तर काही उद्योग घटकांना घरघर ठरली आहे़ ट्रान्स्पोर्टने येणाºया मका आणि गव्हाची आयात तर चादरींची निर्यात ही चक्क १६ जुलैनंतर रेल्वेने सुरू झाली आहे़ सोलापुरात जवळपास ३५ हजार मालवाहतूक ट्रक-टेम्पो जागेवर थांबून असल्याने चालक, क्लीनरसह त्यावर अवलंबित असलेल्या अनेक घटकांची उपासमार सुरू आहे़ या व्यवसायाला चालना देणाºया सवलती शासनाने देण्याची मागणी मोटार मालक संघातून होत आहे.

सोलापुरात लॉकडाऊन काळात दुसºयांदा संचारबंदी अनुभवतोय़ जीवनावश्यक वस्तू वगळता इतर वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले़ परिणामत: सोलापूरच्या ट्रान्स्पोर्ट व्यवसायाचे मोठे नुकसान होत असून, असंख्य कुटुंबांची उपासमार होतेय, ती थांबवण्यासाठी संचारबंदी उठताच रेल्वे आणि एसटी महामंडळाच्या धर्तीवर ट्रान्स्पोर्टलाही ऊर्जितावस्था देणाºया योजना आखून त्या तत्काळ राबवण्याची मागणी मोटार मालक संघाच्या सदस्यांनी केली आहे.

सोलापुरी चादरींची रेल्वेने निर्यात सोलापुरातून दररोज ७० ट्रक चादर-टॉवेलची निर्यात सुरू होती़ लॉकडाऊन काळात याची निर्यात रेल्वे वॅगनने सुरू झाली़ पूर्व भागातून जवळपास ५३ ट्रान्स्पोर्टच्या माध्यमातून चादरी जात होत्या़ कोरोनामुळे पश्चिम बंगाल, मद्रास, बेंगलोर आणि उत्तर भारतातून सोलापुरी चादरीला मागणी वाढली आहे़ याशिवाय येथून काही औषधेही परराज्यात जात आहेत़ 

सोलापुरातून जवळपास ७० लाखांच्या चादरी-टॉवेलची दररोज मालट्रकच्या माध्यमातून वाहतूक होत होती. आता ती रेल्वेच्या माध्यमातून सुरू झाली आहे़ याचा खूप मोठा फटका मालवाहतूकधारकांना बसला आहे़ याला ऊर्जितावस्था देण्यासाठी हमाल, गोडावून कीपरला नव्याने पासेस वितरित करावेत़ - यशवंत साळुंखे संचालक, सोलापूर जिल्हा मोटार मालक संघ 

भुसार बाजारातून दररोज ५० ट्रक मालवाहतूक व्हायची़ जवळपास दररोजची ३० लाखांची उलाढाल ठप्प झाली आहे़ या बाजारावर अवलंबून असणारे हजार हमाल, ५०० तोलार आणि ५०० चालक-वाहक अडचणीत सापडले आहेत़ या व्यवसायाला ऊर्जितावस्था देण्यासाठी मालवाहतुकीवरील इन्शुरन्स दर कमी करावा़- गोपाळ पोला,संचालक, सोलापूर जिल्हा मोटार मालक संघ 

केळी, डाळिंब वाहतुकीला खूप मोठा फटका बसला आहे़ संचारबंदीनंतर गोडावून भाडे, टायरच्या किमती आणि आरटीओच्या विविध महसुलात सवलत द्यावी़ इंधनाचा वापर नसताना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कमी असताना पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याऐवजी वाढवून ट्रान्स्पोर्टधारकांना अडचणीत आणले आहे़ - वसीमभाई इनामदार सदस्य, मोटार मालक संघ, मार्केट यार्ड 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेCentral Governmentकेंद्र सरकारbusinessव्यवसायTransferबदली