शिक्षणमंत्री साधणार सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संवाद!

By बाळकृष्ण दोड्डी | Published: July 14, 2023 04:29 PM2023-07-14T16:29:53+5:302023-07-14T16:30:15+5:30

शनिवार, २२ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ दरम्यान युवा संवाद होणार असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांनी दिली. 

Education Minister will interact with students of Solapur University! | शिक्षणमंत्री साधणार सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संवाद!

शिक्षणमंत्री साधणार सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संवाद!

googlenewsNext

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून 'जी ट्वेंटी अंतर्गत युवा संवाद-२०४७' सदर उपक्रम आयोजिले आहे. शनिवार, २२ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ दरम्यान युवा संवाद होणार असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांनी दिली. 

सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाच्या उद्घाटनास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार युवा विद्यार्थ्यांचा लोकप्रतिनिधीशी संवाद व्हावा तसेच २०४७ पर्यंत भारत विकसित देश होईल, त्या दृष्टीने युवा पिढीला वाटचाल करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील एक हजार विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. 

Web Title: Education Minister will interact with students of Solapur University!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.