शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सुशिक्षितांना शहाणपण यावं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 11:35 IST

जग दिसामासांनी झपाट्याने बदलत आहे. सर्वच स्तरातील स्थित्यंतरे ही नित्याचीच झाली आहेत़ अनेक सोयी-सुविधा सुलभतेने उपलब्ध होत आहेत. तसंच ...

ठळक मुद्देया फलकावरच्या वाक्यातील संवेदनाही वरीलप्रमाणे बोथट व सवयीच्या का...?एकंदर परिणाम साक्षरता बºयाच अंशी सहजसुलभ झाली. ही शिक्षणातली क्रांती आम्हास सुशिक्षिततेची पदवी देऊन गेलीसर्वच स्तरातील स्थित्यंतरे ही नित्याचीच झाली आहेत़ अनेक सोयी-सुविधा सुलभतेने उपलब्ध होत आहेत

जग दिसामासांनी झपाट्याने बदलत आहे. सर्वच स्तरातील स्थित्यंतरे ही नित्याचीच झाली आहेत़ अनेक सोयी-सुविधा सुलभतेने उपलब्ध होत आहेत. तसंच शिक्षणाचं आहे. आज गावे, वाड्या, तांडे, साखरशाळा, पालावरच्या शाळांपासून उच्च महाविद्यालये, विद्यापीठ इतकंच काय तर नानाविध देशातील उच्च पदव्याही मिळविण्याची कला शिकलो. एकंदर परिणाम साक्षरता बºयाच अंशी सहजसुलभ झाली. ही शिक्षणातली क्रांती आम्हास सुशिक्षिततेची पदवी देऊन गेली. अक्षरं कळली, ती रेखाटता आली, त्यांचा अर्थ समजला. कळले पण ते अंगी वळले नाहीत म्हणून त्यातील संवेदनशीलता बोथट झाली म्हणूनच आमच्यावर कोणत्याही सावधानतेच्या सूचनांचा, वागण्याविषयीच्या नियमांचा आमच्यावर काहीही परिणाम होत नाही.

परवा एका कचराकुंडीजवळ एक फलक पाहिला मी़ एक मूर्ख आणि बरंच काही लिहिलं होतं. धूम्रपान करू नये, नो पार्किंग, विविध सिम्बॉल्स, येथे लघवी करू नये, युज मी..लिहिलेले डस्टबीन आरोग्यविषयक नियम, वृक्षारोपण, संवर्धन, बालहक्क विषयक नियम, १४ वर्षांखालील मुलांना काम नको, नो हॉर्न..वगैरे वगैरे हे आणि असेच सारे नियम पालकांचा खरंच एक सुशिक्षित म्हणून आमच्यावर या बाबीचा कितपत परिणाम होतो याचा स्वत:शी प्रामाणिक राहून प्रत्येक सुशिक्षित माणसांनी क्षणभर विचार केला तर लेखशीर्षक खरंच आता सुशिक्षितांना शहाणपण यावं..ही प्रार्थनाच म्हणा हवं तर करणं आज खरंच दुनियादारी करण्याची गरज आहे.

कामावर वेळेवर जावे, आपले नियमित काम वेळेवर पूर्ण करावे, आपल्या अंगी असणारी धमक कुणाशी हेवेदावे करण्यात घालविण्यापेक्षा प्रत्येकाला हेवा वाटावा असं करण्याचा प्रयत्न करावा. आपला व्यवसाय, पेशा, कामातील मूलभूत तत्वनिष्ठा, विचार, कौशल्ये, उद्दिष्टे, वैशिष्ट्ये साध्य करण्यासाठी खरंच काहीच करता येऊ शकत नाही का? मी माझ्या पगारावर समाधानी आहे. तुम्ही माझ्या कामावर समाधानी आहात का? या फलकावरच्या वाक्यातील संवेदनाही वरीलप्रमाणे बोथट व सवयीच्या का...?

 निरंतर शिक्षण योजना राबविली गेली, त्याची ही चित्तरकथा़ निशाणी डावा अंगठा यासारख्या चित्रपटाद्वारे कशी झाली ते पहातोच पण आता त्याच्याही पलीकडे जाऊन ठोस काही उपाययोजना करता येऊ शकतील का? याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. गतिमान जीवनात सावधानता बाळगणं, बाळगण्यासाठीची स्थितरता प्राप्त करणं, तेवढा संयम हवा़ आम्ही कीर्तन, भजन, ओव्या, भारुडे, कथा, सत्संग, प्रवचन, वाचन, ग्रंथवाचन, लेखन, व्याख्यान, श्रवण असे अनेक प्रकार नैमित्तिक करत राहतो. पण आम्ही पुन्हा या साºया गोष्टी समजून उमजून पुन्हा पुन्हा चुकीच्या का करतो? समस्या काय आहेत आम्हाला? का जाणिवा संपत आहेत? का जीवनात देखलेपण, झगमगाटाचं प्रदर्शन, एकट्यातला बटबटीतपणा वाढत आहे. आमच्या नेमप्लेट खालील डिग्रीतली फिलॉसॉफी जीवनात दिसत नाही किंवा धुसर दिसते. ती सुस्पष्ट व्हावी यसाठी काही करता येऊ शकेल का? सुशिक्षितांना छोट्या छोट्या गोष्टीतला शहाणपणा यावा यासाठी आणखी एखादं विद्यापीठ सुरु करावे लागेल का? सुखी माणसं अस्वस्थतेचा सदरा का वापरताना दिसतात़ दिवसेंदिवस सुखाची साधनं वाढत आहेत पण माणसं आतून अशांत तंद्रीत वागताना दिसतात़.

साध्या साध्या गोष्टीत चुका करणं विसरणं, हरवणं एखादी गोष्ट केलीच आहे, याची खात्री नसणं वुई आरऐवजी आय येम लाभणं म्हणजे सुशिक्षितपणा का? जसं आहोत तसं दिसणं, राहणं म्हणजे शहाणपणा असताना आम्ही अस्वाभाविक जगण्याचा वेडेपणा का करत आहोत आम्ही? म्हणूनच म्हणावंसं वाटतं सुशिक्षितांना ...भक्ती, मुक्तीचं कारण ही परहिताय, स्वधर्म रक्षण हेच असावं. माझ्या आनंदाचं कारणच इतरांना आनंदी ठेवणं असायला हवं, पण आज माणसं स्वत:च्या दु:खाने कमी, पण इतरांच्या सुखाने जास्त त्रस्त आहेत आणि हा आजार व्हायरल इन्फेक्शनसारखं झपाट्याने वाढतो आहे म्हणून आम्हाला आता जे शिकलो ते वाचतो, ऐकतो आहोत त्यात जीव-जाणिवा व चैतन्य निर्माण करावं लागेल, तरच सारे नियम आम्हाला कळून ते वर्तनात उतरतील. या लेखाच्या वाचनाने एकातरी सुशिक्षिताचा एक तरी नियम जाणिवेचे पालन किमान एकदा तरी  केल्यास हा लेखन प्रपंच सार्थकी ठरला, असं मला वाटेल. -रवींद्र देशमुख ( लेखक हे निवृत्त शिक्षक व अभ्यासक आहेत )

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा