शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

इको फ्रेंडली रंगपंचमीसाठी वीस प्रकारचे रंग बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:34 PM

सोमवारी रंगपंचमी : विविध रंगांची आवक सर्वाधिक; बाजारपेठेत सुरू  झाली खरेदी

ठळक मुद्देमनामनात आनंदाचा रंग भरणारी रंगपंचमी सोमवारी २५ मार्च रोजी साजरी केली जात आहेसंपूर्ण शहर कोरडा इको फ्रेंडली रंग उधळण्यासाठी सज्ज चेन्नई आणि बंगळुरूहून हे रंग सोलापुरी बाजार पेठेत दाखल

सोलापूर : मनामनात आनंदाचा रंग भरणारी रंगपंचमी सोमवारी २५ मार्च रोजी साजरी केली जात आहे़ यानिमित्त संपूर्ण शहर कोरडा इको फ्रेंडली रंग उधळण्यासाठी सज्ज झाले आहे़ या इको फ्रेंडलीमध्ये जवळपास २० हून अधिक प्रकारचे रंग दाखल झाले आहेत. चेन्नई आणि बंगळुरूहून हे रंग सोलापुरी बाजार पेठेत दाखल झाले आहेत.

शहरात विविध सोसायट्या आणि गजबजलेल्या चौकात, कॉलनीमध्ये रंग खेळला जातो़ तेवढ्याच उत्साहाने बेडर पूल आणि इतर झोपडपट्ट्यांमध्येदेखील रंग खेळण्याची परंपरा गिरणगावात दिसते़ पूर्व भागात कामगार आणि मालक रंग खेळताना पाहायला मिळतात़ सोमवार, २५ मार्च रोजी रंगपंचमी साजरी केली जात आहे़ गेल्या पाच वर्षांतील जनजागृतीचा परिणाम म्हणून पाण्यातील रंग खेळण्याऐवजी शरीरावर साईड इफेक्ट न होणारा इको फ्रेंडली रंग खेळण्यावर भर दिला जातोय़ अशा रंगांची दुकाने मधला मारुती, नवीपेठेत थाटली आहेत़ जीएसटी आणि इतर कर आकारणीमुळे कोरड्या रंगाच्या दरात २० टक्के तर काचेरी रंगाच्या दरात ३० टक्के वाढ झाली आहे़ मात्र चेहºयाला विद्रुप करणारा वारनेस रंग यंदा बाजारपेठेतून हद्दपार झाला आहे.

रंगगाड्यांना शाब्दी ग्रुप पुरवणार कलर - दरवर्षाप्रमाणे यंदा लोधी समाज बालाजी मंदिर ट्रस्टच्या वतीने रंगगाड्यांची मिरवणूक काढली जात आहे़ सोमवारी दुपारी २ वाजता मुर्गीनाला येथील बालाजी मंदिरापासून रंगगाड्यांची मिरवणूक काढली जाणार आहे़ दरवर्षीप्रमाणे यंदाही ५० रंगगाड्या सहभागी होताहेत़ यंदाही या रंगगाड्यांना शाब्दी सोशल ग्रुपच्या वतीने रंग पुरविला जाणार आहे. याचबरोबर गणेशोत्सवाच्या धर्तीवर मंडळप्रमुख वा गाडीचालकाला पोशाख, साखरेचा हार आणि ट्रॉफी देऊन सन्मान केला जाणार असल्याची माहिती शाब्दी ग्रुपचे प्रमुख रसूल पठाण यांनी दिली़ 

मुंबईतील पिचकाºयांची भुरळ...- शाळेच्या मुलांना मोह आवरता येणार नाही, असे वॉटर बॅग, फवारणीचा पंप अशा विविध प्रकारातील खेळणी रूपातील पिचकाºया यंदा मुंबईहून सोलापुरात दाखल झाल्या आहेत़ याबरोबर प्लास्टिक बंदूक, रंगाने भरलेले फुगे यांच्या खरेदीकडे ओढा दिसून येतोय़ १०० रुपये किलोपासून ते लहान-लहान वीस रुपयांची पाकिटे बाजारात दाखल झाली आहेत़ काचेरी डबे आणि इतर प्रकारचे सुटे पारंपरिक रंगही पाहायला मिळताहेत़ 

टॅग्स :SolapurसोलापूरcolourरंगrangoliरांगोळीMarketबाजार