शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सोलापूरच्या अणू आवर्त सारणीच्या प्रतिकृतीचा मॉरिशसमध्ये डंका

By appasaheb.patil | Updated: January 9, 2020 10:44 IST

सोलापुरातील महापालिका शाळेतील शिक्षकाची किमया; देशात मिळविला दुसरा क्रमांक

ठळक मुद्दे२०१९ हे वर्ष जगभर आवर्त सारणीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे होत आहेरासायनिक मूलद्रव्याचे वर्गीकरण आवर्त सारणीच्या स्वरूपात केले़ या घटनेला यंदा १५० वर्षे पूर्ण मॉरिशस येथे आंतरराष्ट्रीय परिषद भरविण्यात आली होती

सोलापूर : अणूचा आकार, त्रिज्या, त्याचे वस्तुमान अन् त्याच्या आकारमानात होणारा बदल यासंदर्भातील अमूर्त संकल्पना समजावून सांगण्यासाठी एकच सोडियमचा अणू तयार करून उपयोग नाही, त्यासाठी पूर्ण आवर्त सारणी तयार करण्याची गरज आहे, असे ठासून सांगत सोलापूर महापालिका शाळा क्रमांक २ चे विज्ञान शिक्षक युध्दवीर महिंद्रकर यांनी सादर केलेल्या अणूच्या आवर्त सारणीला (पिरॉडिक टेबल) मॉरिशस येथे आयोजित केलेल्या वैज्ञानिकांच्या आंरराराष्टÑीय परिषदेत दुसरा क्रमांक मिळाला आहे.

आॅस्ट्रेलिया आणि मॉरिशस इस्टिट्यूट आॅफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्टीन विद्यापीठात आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत महिंद्रकर यांनी भाग घेतला होता.

अ‍ॅल्युमिनियम, सिलिकॉन यांसारख्या गुणमर्धाच्या मूलद्रव्य सापडतीलच असा अंदाज रशियन रसायनशास्त्रज्ञ डर्मिट मेंडेलीव्हने पूर्ण आत्मविश्वासाने व्यक्त केला होता़ तो अंदाज १८७२ साली खरा ठरला़ मेंडेलीव्हने १८६९ साली रासायनिक मूलद्रव्याचे वर्गीकरण आवर्त सारणीच्या स्वरूपात केले़ या घटनेला यंदा १५० वर्षे पूर्ण होत आहेत.

 म्हणून २०१९ हे वर्ष जगभर आवर्त सारणीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे होत आहे़ त्यानिमित्त मॉरिशस येथे आंतरराष्ट्रीय परिषद भरविण्यात आली होती.

या परिषदेत अमेरिका, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड यांसह अन्य १०२ देशांतील वैज्ञानिकांनी सहभाग नोंदविला होता़ यात ११८ मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीच्या प्रतिकृती आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरल्या. त्या सारणीच्या अणूंच्या प्रतिकृती आणि ‘पीपीटी’च्या (पॉवर पॉईन्ट प्रेझंटेशन) साहाय्याने महिंद्रकर यांनी भारतीय त्रिमितीय आवर्त सारणी या विषयावरील संशोधनावर आपले मत मांडले़

काय होती महिंद्रकरांची प्रतिकृती...- याबाबत दयानंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य स्व़ नागेश धायगुडे, प्रा़ वैशाली धायगुडे यांच्याशी चर्चा करून क्रांतिवीर महिंद्रकर व कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने ही सारणी पूर्ण केल्याचे युद्धवीर महिंद्रकर सांगतात़ यासाठी मला प्रा़ डॉ़ सुधाकर आगरकर, जयंत जोशी, अ़ पां़ देशपांडे, हेमंत लागवणकर, ज्येष्ठराज जोशी, प्रा़ डॉ़ राजशेखर हिप्परगी, प्रा़ व्यंकटेश गंभीर, रवी कटारे, योगीन गुर्जर, मुख्याध्यापक मोटे, छाया महिंद्रकर यांची मदत झाल्याचेही महिंद्रकर यांनी सांगितले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSchoolशाळाEducationशिक्षण