शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

वादळी वाºयामुळे वाणीचिंचाळेतील तब्बल सत्तर घरांचे उडाले पत्रे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 13:05 IST

१२ शेतकºयांचे द्राक्षे, डाळिंबाचे नुकसान : यलमार मंगेवाडीत शेळ्याचे शेड उडाले, छावण्यातील  शेडनेटही जमीनदोस्त

ठळक मुद्देदुष्काळाने होरपळणाºया सांगोला तालुक्यावरील दुष्टचक्र काही केल्याने संपता संपेना वादळी वाºयामुळे १० गावातील शेकडो घरांवरील पत्रे उडून गेले एकट्या वाणीचिंचाळे गावातील ७० घरांवरील पत्रे उडून गेल्याने कुटुंबं बेघर झाले

सांगोला : दुष्काळाने होरपळणाºया सांगोला तालुक्यावरील दुष्टचक्र काही केल्याने संपता संपेना. रविवारी रात्री १० च्या सुमारास वादळी वाºयामुळे १० गावातील शेकडो घरांवरील पत्रे उडून गेले असून, एकट्या वाणीचिंचाळे गावातील ७० घरांवरील पत्रे उडून गेल्याने कुटुंबं बेघर झाले आहेत. याच गावातील १२ शेतकºयांचे द्राक्षे व डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे़ य.मंगेवाडी येथे शेळ्याचे शेड उडून गेले. सुदैवाने या घटनेत कोठेही जीवितहानी झाली नाही; मात्र वादळी वारे व पावसामुळे छावण्यातील जनावरांच्या निवाºयासाठी उभारलेले शेडनेट उडून गेल्याने जनावरे व पशुपालकांचे हाल झाले. 

रविवारी तालुक्यात मान्सून पावसाचे जोरदार आगमन झाले असून ९ मंडलनिहाय सरासरी ११़२२ मि.मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती तहसीलदार संजय पाटील यांनी दिली़ गेल्या पाच ते सहा महिन्यापासून भीषण दुष्काळी परिस्थिती व प्रचंड तापमानामुळे शहर व तालुक्यातील नागरिक हैराण झाले होते़ कधी एकदा मान्सूनचा पाऊस पडतोय आणि उन्हाळ्यातून सुटका होते यासाठी सर्वांचे डोळे पावसाकडे लागून राहिले होते.

गेल्या दोन, चार दिवसांपासून वातावरणात बदल होत असून वादळी वारे व मेघगर्जनेसह तुरळक पावसाच्या सरी कोसळत आहेत. रविवारी दुपारी ४ नंतर आकाशात ढगाळ वातावरण निर्माण होऊ लागले होते. रात्री १० च्या सुमारास अचानक जोरदार वादळी वारे वाहू लागताच मेघगर्जनेसह मान्सून पावसाचे आगमन झाले. तासभर वादळी वाºयातच मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र रस्त्यावरुन पाणी वाहू लागले. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता.

दरम्यान, वादळी वाºयात मेडशिंगी येथील ६ घरांचे, बुरलेवाडी २ घरावरील, आलेगाव येथील ४ घरांचे, सांगोल्यातील १३ घरांवरील, सोनलवाडी येथील २ घरांचे, वाणीचिंचाळे येथील तब्बल १७ घरांवरील, घेरडी-लोटेवाडी-अजनाळे-लिगाडेवाडी या गावातील प्रत्येकी ५ घरांवरील पत्रे उडून गेल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहेत.  य.मंगेवाडी येथे शेळ्याचे शेड व वाणीचिंचाळे येथील १२ खातेदार शेतकºयांचे द्राक्षे व डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे.  आलेल्या पावसाने शेतकºयांमधून व्यक्त होत असताना नुकसानीने ते हतबल झाले ओहत.

भंडारकवठे परिसरात  पाणीच पाणीसोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे, माळकवठे, निंबर्गी परिसरात रविवारी रात्री पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सुमारे दोन तास पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले.

रविवारी दिवसभर उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. सायंकाळनंतर आभाळ भरून आले आणि रात्री नऊ वाजता पावसाला प्रारंभ झाला. सुमारे दोन तास कमी-अधिक प्रमाणात हा पाऊस कोसळत होता. या पावसाने रानात पाणीच पाणी झाले. खड्डे पाण्याने भरून गेले. काही भागात पावसामुळे पाणी असल्याचे दिसून आले. 

पंचनामा करण्याचे तहसीलदारांचे आदेश- तहसीलदार संजय पाटील यांनी तलाठ्यांना संबंधित गावात जाऊन पत्रे उडून गेलेल्या घरांचे व नुकसान झालेल्या फळबागांचे पंचनामे करुन अहवाल कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तलाठ्यांनी सोमवारी दिवसभर पंचनामे सुरु होते.- सांगोल्यात रविवारी रात्री मंडलनिहाय पावसाची आकडेवारी : सांगोला १५, हातीद ३, नाझरा १, महूद १८, संगेवाडी १७, सोनंद ११, जवळा २, कोळा ७, शिवणे २७ असा एकूण १०१ मि. मी़ पाऊस झाला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसdroughtदुष्काळ