रक्ताच्या उलट्यांमुळं तरुणाचा दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच मृत्यू

By रवींद्र देशमुख | Published: April 3, 2024 07:45 PM2024-04-03T19:45:12+5:302024-04-03T19:45:30+5:30

डॉक्टरांनी केलेल्या तपासणी त्यांनी मृत्यू झाल्याचं घोषित केले.

Due to vomiting of blood, the youth died before reaching the hospital | रक्ताच्या उलट्यांमुळं तरुणाचा दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच मृत्यू

रक्ताच्या उलट्यांमुळं तरुणाचा दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच मृत्यू

सोलापूर: सतत उलट्या आणि रक्ताच्या जुलाबानं तळमळणाऱ्या तरुणाला दवाखान्यात पोहचवण्यापूर्वीच त्याच्यावर काळानं घाला घातला. डॉक्टरांनी केलेल्या तपासणी त्यांनी मृत्यू झाल्याचं घोषित केले. बुधवारी ही घटना घडली. मनोज प्रभाकर विटकर (वय- ४०, रा. बेंबळे, ता. माढा) असे या तरुणाचे नाव आहे. यातील तरुणाला मंगळवारी रात्रीपासून सतत उलट्या आणि रक्ताचे जुलाब होत असल्याने तो त्रासला होता. रात्रभर तो तळमळत होता.

त्याचा त्रास पहावेनासा झाल्याने त्याला अत्यवस्थ  अवस्थेत खासगी वाहनाद्वारे भाऊजी अर्जुन यमपूरे यांनी येथील शासकीय दाखल केले. डॉ. पूजा लवटे यांनी त्याची तातडीने तपासणी केली असता त्याचा घरातून रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच वाटेत मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची सिव्हील पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Due to vomiting of blood, the youth died before reaching the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.