नुकसानीचे अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्यानं घेतला गळफास; उस्मानाबाद जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 12:33 IST2021-11-17T12:32:17+5:302021-11-17T12:33:08+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

नुकसानीचे अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्यानं घेतला गळफास; उस्मानाबाद जिल्ह्यातील घटना
कारी : कारी (ता. उस्मानाबाद) येथील शेतकरी बिरमल केशव जाधव (वय 45) गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वतःच्या शेतात चिंचेच्या झाडाला गळफास घेतला.
शेतीमध्ये वारंवार येणाऱ्या अवकाळी पावसामुळे तसेच होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी पिक विमा भरून देखील अनुदान पासुन वंचित राहावे लागले. त्यामुळं मी माझं आयुष्य संपवित असल्याचं चिट्टी त लिहिलं होतं. बिरमल याच्या पाश्चात्य पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.