शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
4
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
5
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
6
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
7
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
8
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
9
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
10
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
11
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
12
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
13
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
15
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
16
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
17
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
19
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
20
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!

पावसाच्या चार नक्षत्रांनी सोलापूर जिल्ह्याला दिली हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 14:39 IST

पाऊस पडेल या अपेक्षेवर बहुतांश शेतकºयांनी पेरण्या केल्या;सरासरीच्या अवघा ४३ टक्के पाऊस पडल्याची नोंद

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील ९२ पैकी ६० मंडलांत ७० मि. मी. पेक्षा कमी पाऊस पडला५० दिवसांत ७० मि.मी. पर्यंत पडलेला पाऊस हा कधी-कधी पडलेला पाऊसअळींचा प्रादुर्भाव असल्याने जनावरांसाठी चारा असलेले मका पीकही अळ्याच फस्त करण्याची भीती

सोलापूर : एकामागून एक पावसाळ्यातील चार नक्षत्रांचा पाऊस म्हणावा तसा पडला नसल्याने यावर्षीचाही खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे. पाऊस पडेल या अपेक्षेवर बहुतांश शेतकºयांनी पेरण्या केल्या असल्या तरी पिके मात्र येण्याची शक्यता मावळली आहे. सरासरीच्या अवघा ४३ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षी ३९ टक्के इतकाच पाऊस पडला होता. त्यामुळे खरीप व रब्बी या दोन्ही हंगामातील पिके आली नाहीत. शेतकºयांनी पेरणीवर केलेला खर्चही वाया गेला होता. याशिवाय पाऊस पडला नसल्याने द्राक्ष, केळी, ऊस, डाळिंब व अन्य फळपिकांनाही फटका बसला आहे. उजनी धरण क्षेत्र, भीमा नदीकाठ तसेच अन्य जिल्ह्यातील धरणातील पाणी मिळालेला अल्पसा भाग वगळता अन्य ठिकाणी बागायती क्षेत्र पाहावयासही शिल्लक राहिले नाही. यावर्षी तरी पाऊस पडेल, अशी अपेक्षा शेतकºयांची होती. मात्र रोहिणी, मृग, आर्द्रा व पुनर्वसु ही चारही नक्षत्रे काही गावांचा अपवाद सोडला तर कोरडीच गेली आहेत. काही मंडलांत पाऊस बºयापैकी पडल्याची नोंद पर्जन्यमापकांच्या आधारे झाली असली तरी ती एका गावासाठीच मर्यादित असल्याचे सांगितले जाते. मंडलातील एक-दोन गावांतच पाऊस पडतो व त्याची नोंद होते, असे शेतकरी सांगतात. 

सोलापूर जिल्ह्यातील ९२ पैकी ६० मंडलांत ७० मि. मी. पेक्षा कमी पाऊस पडला आहे. काही मंडलांत तर ६ मि.मी. इतकाच पाऊस पडला आहे. ५० दिवसांत ७० मि.मी. पर्यंत पडलेला पाऊस हा कधी-कधी पडलेला पाऊस आहे. त्यामुळे जनावरांसाठी गवत येण्यासारखाही पाऊस पडलेला नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात बºयाच शेतकºयांनी पेरण्या उरकून घेतल्या आहेत. काही शेतकºयांनी जनावरांसाठी मका पेरणी केली आहे. मात्र पाऊस नसल्याने उगवणही होणे कठीण आहे. उगवण झाली तर अळींचा प्रादुर्भाव असल्याने जनावरांसाठी चारा असलेले मका पीकही अळ्याच फस्त करण्याची भीती आहे. काही मंडलांत चांगला पाऊस पडला असला तरी सरासरी ४३ टक्के पाऊस पडल्याची नोंद मात्र झाली आहे. 

या मंडलांत पडला ७० मि.मी.पेक्षा कमी पाऊस - शेळगी, तिºहे, वळसंग, मुस्ती, विंचूर, खांडवी,वैराग, उपळे दुमाला, बानगाव, नारी, जेऊर, तडवळ, करजगी, किणी, वाघोली, कामती बु., शेटफळ, सावळेश्वर, नरखेड, पेनूर, टाकळी सिकंदर, मोडनिंब, लऊळ, सीना दारफळ, रोपळे क., टेंभुर्णी, म्हैसगाव, करमाळा, कोर्टी, केत्तूर, केम, जेऊर, उमरड, सालसे, अर्जुननगर, पंढरपूर, कासेगाव, तुंगत, पुळूज, चळे, करकंब, सांगोला, हातीद,नाझरा, संगेवाडी, शिवणे, माळशिरस, लवंग, सदाशिवनगर, इस्लामपूर, नातेपुते, अकलूज, दहिगाव,बोराळे, मरवडे, हुलजंती,भोसे, आंधळगाव,मारापूर आदी.

पडलेल्या पावसाच्या आधारे खरीप पेरणी झाली आहे. पाऊस पडेल या अपेक्षेने शेतकरी पेरणी करु लागले आहेत. मात्र पिकांना पोषक पाऊस पडत नाही. त्यामुळे खरीप पेरणी वाया जाण्याची शक्यता आहे. मात्र यापुढे चांगला पाऊस पडला तर तूर व मका ही पिके येऊ शकतात.- बसवराज बिराजदारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसdroughtदुष्काळFarmerशेतकरीagricultureशेती