शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यातील बारा गावांची तहान भागतेय आठ टँकरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 12:13 IST

सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे ऐन थंडीच्या दिवसातच ग्रामिण भागात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी गावात ...

ठळक मुद्देएक किमीच्या वाहतुकीसाठी टँकरला २७0 रुपयांचे मिळते इंधन अनुदानराज्य शासनाने २९ नोव्हेंबर रोजी शासन निर्णय काढून दुष्काळी तालुक्यांची यादी  जाहीर केली

सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे ऐन थंडीच्या दिवसातच ग्रामिण भागात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी गावात पाणीच उपलब्ध नसल्याने सध्या १२ गावातील नागरिकांना ८ टँकरच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाणी देण्यात येत आहे. इंधनाच्या दरात गत पाच वर्षात सातत्याने वाढ झाल्याने टँकर वाहतूकदारास पाणीपुरवठा करण्यासाठी प्रतीकिलोमीटरसाठी २७0 रुपये इंधन अनुदान देण्यात येत आहे. 

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी टँकर देण्यापुर्वी विविध उपाय योजना करण्याचे आदेश  राज्य शासनाने  दिले आहेत. शेवटचा पर्याय म्हणून अपरिहार्य परिस्थितीतच टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.

राज्य शासनाने २९ नोव्हेंबर रोजी शासन निर्णय काढून दुष्काळी तालुक्यांची यादी  जाहीर केली आहे. पूर्वी टँकर मंजूरीचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे होते. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे   टंचाईत त्वरीत उपाय योजना करण्यासाठी  टँकर मंजूर करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांना देण्यात आला आहे. 

टँकर मंजूर करण्यापूर्वी गावातील विहीर, विंधन विहीर अधिग्रहण करणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती करण्यात यावी. बंद प्रादेशिक योजना कार्यान्वित करण्यासाठी  तेथून  पाणीपुरवठा करणे शक्य आहे का याची पडताळणी करण्याच्या सूचनाही शासनाने प्रशासनास दिले आहेत. 

 अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला, करमाळा, माढा माळशिरस या तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुका यादीत करण्यात आला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील  शेळगी, तिºहे, मार्डी, वडाळा व  बार्शी तालुक्यातील आगळगांव, वैराग, उपालेडू, गौडगांव, पांगरी, पानगांव, नारी, सुर्डी, खांडवी या महसुली मंडळाचा समावेश दुष्काळी यादीत झाला आहे. 

टँकरच्या पाण्यावर या गावांची भागतेय तहान- माढा तालुक्यातील तुळशी, पडसाळी, जाधववाडी, भैरागवाडींना पाणीपुरवठासाठी चार टँकर सुरु आहेत. करमाळा तालुक्यातील पिसरे, पांडे, शेलगांव, धोटी साठी तीन  टँकर तर सांगोला तालुक्यातील गळवेवाडी, इटकी, यलमार मंगेवाडींना गावाला एक  टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरwater transportजलवाहतूकdroughtदुष्काळSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय