शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळामुळे वाखरी, भंडीशेगाव परिसरातील फळबागा करपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 13:15 IST

दुष्काळाची दाहकता ; बोअर, विहिरी आटल्या, पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई, शेतकरी, नागरिक धास्तावले, प्रशासनाचे दुर्लक्ष

ठळक मुद्देवाखरी, भंडीशेगाव परिसरातील शेतकºयांची उभी पिके पाण्याअभावी जाळून शेकडो कोटींचे नुकसानजळालेल्या पिकांचे पंचनामे करून फळबागा, ऊस यासह चारा, भाजीपाला पिकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे

पटवर्धन कुरोली : वाखरी, भंडीशेगाव (ता. पंढरपूर) परिसरात भीषण दुष्काळामुळे विहिरी, बोअर कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांची ऊस, केळी, डाळिंब, द्राक्ष, कडवळ, मका आदी पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत.  पिण्याच्या पाण्याचीही भीषण टंचाई जाणवू लागली आहे. घागरभर पाण्यासाठी नागरिकांना मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाकडून टँकर सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी तो येतो कधी आणि कुणाला पाणी देतो. याची अनेक ग्रामस्थ, शेतकºयांना माहितीच नाही. प्रशासन याविषयी गंभीर दिसत नसल्याने शेतकरी ग्रामस्थ धास्तावले आहेत.

मागील वर्षी कमी प्रमाणात झालेला पाऊस, कॅनॉलच्या पाण्याचे कोलमडलेलं नियोजन यामुळे वाखरी, भंडीशेगाव परिसरातील भूजलपातळी कमालीची खालावली आहे. ५०० फूट खोल बोअर, विहिरीही पूर्ण कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतकरी, नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वाखरी, भंडीशेगाव परिसरात उसाचे क्षेत्र कमी असले तरी कमी पाण्यावर येतील अशा डाळिंब, केळी, द्राक्ष अशा फळबागा, कडवळ, मका अशी चाºयाची पिके व भाजीपाल्याची लागवड शेतकºयांनी ठिबक सिंचनावर केली होती; मात्र जिथे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असेल तिथे ठिबकद्वारे पिकांना कुठून पाणी येणार अशी परिस्थिती आहे. ऐन उन्हाळ्यात अनेक शेतकºयांनी डाळिंब बागा जोपासल्या. त्या बागांना फळेही चांगली आली; मात्र ती फळे विक्रीयोग्य होण्याअगोदरच पाण्याअभावी अख्ख्या बागाच जळून खाक होत आहेत. ऊस व इतर पिकांची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळं शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

कवडीमोल किमतीला दुभत्या जनावरांची विक्री- वाखरी, भंडीशेगाव या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी विहीर व बोअरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते.  कॅनॉलला पाणी आले तरच विहीर, बोअरची पाणी पातळी समान राहते. यावर्षी पाण्याचे नियोजन कोलमडल्याने विहीर, बोअरच्या पाण्याची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरात दूध व्यवसायावर अनेक शेतकºयांचे अर्थकारण चालते; मात्र जनावरांना हिरवा चारा मिळणे अवघड झाल्याने अनेक शेतकºयांनी आपली दुभती जनावरे कवडीमोल किमतीला विकून टाकली आहेत. दूध व्यवसायही धोक्यात आला आहे. त्यामुळे शेतकºयांचे अर्थकारण पूर्ण कोलमडले आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करणे, वाड्यावस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करणे गरजेचे आहे. मात्र प्रशासन याविषयी फारसे गंभीर नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिक शेतकºयांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्लॉट एरिया परिसरात पाण्याचा टँकर सुरू करावा- वाखरी प्लॉट एरिया इसबावी परिसरात मोठी लोकवस्ती आहे. या परिसरात नगरपालिका व वाखरी ग्रामपंचायतीतर्फे कोणतीही सार्वजनिक पाणीपुरवठ्याची सोय नाही. अनेक नागरिकांच्या स्वत:च्या मालकीच्या बोअर आहेत. बहुतांश त्या सर्व बोअरच्या पाण्याने तळ गाठला आहे. तर काही बोअर पूर्ण बंद पडल्याने पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सुरू आहे; मात्र याकडे पंढरपूर नगरपालिका, वाखरी ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याने नागरिकांवर पाण्यासाठी स्थलांतर करण्याची वेळ येऊ लागली आहे. या परिसरात प्रशासनाने पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

नुकसानभरपाई द्या- वाखरी, भंडीशेगाव परिसरातील शेतकºयांची उभी पिके पाण्याअभावी जाळून शेकडो कोटींचे नुकसान झाले आहे. अशा जळालेल्या पिकांचे पंचनामे करून फळबागा, ऊस यासह चारा, भाजीपाला पिकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळagricultureशेतीFarmerशेतकरीwater shortageपाणीटंचाई