शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

पीक पध्दतीत बदल केल्याने दोन एकरात घेतले तीन लाखांचे खरबूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:54 IST

फुलचिंचोलीतील फळं पुण्याच्या बाजारपेठेत; फुलचिंचोलीतील नकुल बनसोडे यांची यशोगाथा

ठळक मुद्देतोट्यातील शेतीतून कमी कालावधीत आणि कमी खर्चात येणाºया खरबुजाची लागवड  नकुल बनसोडे असे त्या अवलियाचे नाव आहे पंढरपूर तालुक्यात फुलचिंचोली येथे त्यांची साडेपाच एकर जमीनकमी दिवसात व कमी पाण्यावर येणाºया खरबुजाकडे ते वळाले़ धनाजी होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या फळपिकाला सुरुवात

अंबादास वायदंडे सुस्ते : पारंपरिक पिकाला कंटाळून पीक पद्धत बदलण्याचा निर्णय घेतला़..तोट्यातील शेतीतून कमी कालावधीत आणि कमी खर्चात येणाºया खरबुजाची लागवड केली...५० दिवसात खताची योग्य मात्रा दिली. वेळेत कीटकनाशकं फवारली. रासायनिक खताबरोबर शेणखत अन् बेसन मिक्स क रून ट्रॅक्टरने रोटरुन घेतले..क़मी पाण्यात ५० दिवसात ६५० कॅरेट उत्पादन निघाले आणि तीन लाखांचे उत्पन्न काढले आहे़ यातून आणखी १२०० कॅरेट उत्पादन निघणार असून सर्व फळं ही पुण्याच्या बाजारपेठेत विकली जात आहेत़ ही किमया साधली आहे फुलचिंचोलीतील एका शेतकºयाने.

 नकुल बनसोडे असे त्या अवलियाचे नाव आहे पंढरपूर तालुक्यात फुलचिंचोली येथे त्यांची साडेपाच एकर जमीन आहे. अनेक वर्षांपासून उसाचे पीक घेत होते़ या पिकाला जास्त कालावधी व जास्त पाणी लागते. खूप मेहनत घेऊनही योग्य दर मिळत नसल्याने बनसोडे नाराज झाले़ पीकपद्धत बदलण्याचा निर्णय त्यांनी घेतला़ कमी दिवसात व कमी पाण्यावर येणाºया खरबुजाकडे ते वळाले़ धनाजी होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या फळपिकाला सुरुवात केली़ दोन एकरात मशागत करून त्यामध्ये चार ट्रेलर शेणखत वापरले़ त्यानंतर रासायनिक खत, शेणखत व बेसन मिक्स होण्यासाठी ट्रॅक्टर रोटरून त्यावर मल्चिंग पेपर अंथरला़ मोहोळ तालुक्यातून पासले येथून दोन रुपये दराने १७ हजार रोपं आणली.

 १८ डिसेंबर रोजी अडीच फुटावर ३ कुंदन वाणाच्या खरबुजाची रोपं लावली़ रोपाच्या बुडात पंपाद्वारे खताची मात्रा दिली़ तसेच एक दिवसाआड वीस मिनिट ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले. खरबुजाच्या वेलावर आळी व नाग आळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कीटकनाशकाची फवारणी केली. करपा, कुजवा, डावगी व भुरी हे आजार पसरु नयेत म्हणून बुरशीनाशकांची फवारणी केली. ठिबकच्या माध्यमातूून ११़४२़११ हे विद्राव्य खत दिले. तसेच खरबुजाची फुगवण व्हावी म्हणून काही रासायनिक खते ठिबकमधून दिली. तसेच खरबूज तडकू नये म्हणून कॅल्शियम एक्साइडची फळावर फवारणी केली.

अशाप्रकारे नकुल बनसोडे  यांच्या प्रयत्नाला वडील मधुकर बनसोडे, आई राजाबाई बनसोडे, पत्नी साधना बनसोडे, भाऊ  नानासाहेब बनसोडे, भावजय संध्याराणी बनसोडे, मित्र दादाश्री गायकवाड, तानाजी मोहोळकर यांची साथ लाभली. 

५० दिवसांत पहिली तोड - व्यवस्थापन केल्यानंतर ४० ते ५० दिवसाने पहिल्या तोडीत १०० कॅरेट खरबूज निघाले़ दुसरी तोड २७५ कॅरेट तर तिसरी तोड ३५० कॅरेट  निघाला़ आत्तापर्यंत ६२५ कॅरेट खरबूज निघाले़ एका कॅरेटमध्ये १९ किलो खरबुजाचे वजन ठरले. एक किलो खरबुजापोटी २८ ते ३० रुपये दर मिळाला़ आतापर्यंत ११ टन खरबूज निघाले़ ३  लाख रुपयांचे उत्पन्न निघाले आहे़ आणखी १२०० कॅरेट अर्थात २१ टन खरबूज निघणे अपेक्षित आहे. यापासून चार ते साडेचार लाख रुपये आणखी मिळणार आहेत. 

उसाला कारखान्याकडून योग्य दर मिळत नाही़ याला कंटाळून दोन वर्षांपूर्वी धनाजी मोहोळकर यांच्या खरबुजाची शेती पाहिली आणि तोच प्रयोग केला़ विष्णू गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खरबुजाची लागवड केली़ लागवडीनंतर ७० दिवसांत साडेसात लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.

- नकुल बनसोडे, खरबूज उत्पादक,  फुलचिंचोली (ता. पंढरपूर)

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार