नशेत हातावर ब्लेडनं मारुन घेतलं; शासकीय रुग्णालयात दाखल

By रवींद्र चांदेकर | Updated: August 7, 2023 18:11 IST2023-08-07T18:11:32+5:302023-08-07T18:11:41+5:30

व्यसन स्वत:ची विवेकबुद्धी हरवण्याचं काम करतं. सोलापुरात एका तरुणानं दारुच्या नशेमध्ये स्वत:च्या हातावर ब्लेडनं चिरा मारुन घेतल्या.

Drunk on the hand with a blade Admitted to government hospital | नशेत हातावर ब्लेडनं मारुन घेतलं; शासकीय रुग्णालयात दाखल

नशेत हातावर ब्लेडनं मारुन घेतलं; शासकीय रुग्णालयात दाखल

सोलापूर : व्यसन स्वत:ची विवेकबुद्धी हरवण्याचं काम करतं. सोलापुरात एका तरुणानं दारुच्या नशेमध्ये स्वत:च्या हातावर ब्लेडनं चिरा मारुन घेतल्या. यात तो जखमी झाल्यानं उपचारासाठी दवाखन्यात दाखल करावं लागलं. आनंद अंबादास मंजेली असं या जखमी तरुणाचं नाव आहे. शहरातील रविवार पेठेत रविवारी ही घटना घडली.

 यातील आनंद याला दारुचं व्यसन जडल्यानं तो चिडचिड करायचा. रविवारी साडेअकराच्या सुमारास तो दारु पिऊन घरी आला, त्राग्यातून त्याने स्वत:च्या उजव्या हातावर ब्लेडनं मारुन घेतल्यानं चिरा पडून आतून रक्त येऊ लागला. यामुळे घरामध्ये एकच गोंधळ उडाला. आजूबाजूच्या लोकांच्या मदतीनं अंबादासला त्याची पत्नी मंजू यांनी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.

Web Title: Drunk on the hand with a blade Admitted to government hospital