सोलापुरात १ ते ३ मार्च दरम्यान नाट्यमहोत्सव; शेकडो कलाकारांचा असणार सहभाग
By Appasaheb.patil | Updated: February 27, 2023 17:09 IST2023-02-27T17:08:41+5:302023-02-27T17:09:14+5:30
या नाट्य महोत्सवात सोलापुरातील सात संघांनी सहभाग घेतला असून २०० कलावंत आपला कलाविष्कार या महोत्सवात सादर करणार आहेत.

सोलापुरात १ ते ३ मार्च दरम्यान नाट्यमहोत्सव; शेकडो कलाकारांचा असणार सहभाग
सोलापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उननगरीय शाखेच्यावतीने सोलापुरात १ ते ३ मार्च या कालावधीत हुतात्मा स्मृती मंदिरात नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नाट्य परिषद सोलापूरचे अध्यक्ष विजय साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या नाट्य महोत्सवात सोलापुरातील सात संघांनी सहभाग घेतला असून २०० कलावंत आपला कलाविष्कार या महोत्सवात सादर करणार आहेत. प्रत्येक सहभागी नाट्य संस्थांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून नाट्यप्रयोग सुरू होणार आहे. बुधवारी ५ व गुरूवारी १ आणि शुक्रवारी १ अशा ७ नाट्यकृतीचे सादरीकरण होणार आहे. या नाट्यमहोत्सवास जास्तीत जास्त नाट्य कलावंतांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस शशिकांत पाटील, दिनेश शिंदे, प्रशांत शिंदे, संदीप जाधव, जयप्रकाश कुलकर्णी आदी उपस्थित होते.