शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

छत्रपती संभाजी तलावात ड्रेनेजचे पाणी, वाढलेली जलपर्णी अन् दुर्गंधीयुक्त वासाने सोलापुरातील नागरिकांचे स्थलांतर

By appasaheb.patil | Updated: December 7, 2022 17:54 IST

छत्रपती संभाजी महाराज तलाव सुशोभीकरण व संवर्धनासाठी केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्यावतीने मोठा निधी मंजूर झालेला असून जवळपास सहा कोटींचा निधी महानगरपालिकेला प्राप्त झालेला आहे, त्यातून छत्रपती संभाजी महाराज तलावाचा एक पर्यटन स्थळ म्हणून विकास होणे गरजेचे होते. पण...

सोलापूर: विजापूर रोड भागातील निसर्गरम्य परिसरात असलेल्या छत्रपती संभाजी महाराज तलावात ड्रेनेजचे पाणी सोडण्यात येत आहे. शिवाय जलपर्णीमुळे तसेच चिलटे, डास व दुर्गंधीयुक्त वासामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी सैनिक नगर, वसंत नगर, पोस्टल कॉलनीमधील अनेक लोक स्थलांतर करीत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.

छत्रपती संभाजी महाराज तलाव सुशोभीकरण व संवर्धनासाठी केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्यावतीने मोठा निधी मंजूर झालेला असून जवळपास सहा कोटींचा निधी महानगरपालिकेला प्राप्त झालेला आहे, त्यातून छत्रपती संभाजी महाराज तलावाचा एक पर्यटन स्थळ म्हणून विकास होणे गरजेचे होते. पण या ठिकाणी महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ते होताना दिसत नाही.

मध्यंतरी सहा महिने जलपर्णी काढण्याचे काम एका ठेकेदाराकडून करून घेण्यात आले. त्याला लाखो रुपये खर्च झालेला पैसा वाया जात आहे. या भागातील नागरिकांकडून वसाहतीतील ड्रेनेजचे पाणी या तलावात सोडले जाते. त्यामुळे या तलावातील पाण्याला उग्र दुर्गंधी सुटली असून अनेक तलावातील जलचर प्राण्यांचा जीव धोक्यात आहे.

संभाजी ब्रिगेडचे अनोखे आंदोलन -छत्रपती संभाजी तलावात वाढत असलेली जलपर्णी, दुर्गंधी वाढत असल्याने संभाजी ब्रिगेडने महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त विजय खरोटे यांना जलपर्णीचा पुष्पगुच्छ देऊन अनोखे आंदोलन करण्यात आले. याचवेळी शहर संघटक दत्ता जाधव यांनी अंगावर जलपर्णी वस्त्र धारण करून लक्ष वेधले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, अमित जाधव, राहुल सावंत, राजेंद्र माने, सीताराम बाबर, श्रीकांत कोळी इत्यादी उपस्थित होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका