डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

By आप्पासाहेब पाटील | Updated: April 20, 2025 19:19 IST2025-04-20T19:19:18+5:302025-04-20T19:19:39+5:30

मेलवरून दिली होती धमकी.. पुन्हा मागितली माफी

Dr. Shirish Valsangkar suicide case; Note found, reason for suicide come to light? | डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

आप्पासाहेब पाटील/सोलापूर : सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येचे कारण आता समोर आले आहे. सोलापूर पोलिसांना त्यांच्या घरामध्ये एक चिठ्ठी सापडली असून, त्या चिठ्ठीमध्ये डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्येचे कारण लिहिले आहे.

ज्या माणसाला मी शिकून आज एओ केले आणि चांगला पगार देतो आहे, त्याने खोटारडे अन् घाणेरडे आरोप करून मला धमकावले आहे, याचे मला आतीव दुःख होत आहे म्हणून मी माझे जीवन संपत आहे, असा मजकूर लिहिला असल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले.

डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी आज सकाळी हॉस्पिटलमध्ये प्रशासनाधिकारी मनीषा मुसळे - माने हिला पोलिसांनी अटक करून आज कोर्टात हजर केले होते. कोर्टाने मनीषा हिला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

मेलवरून दिली होती त्या महिलेने धमकी.. पुन्हा मागितली माफी 

हॉस्पिटलमधील त्या महिलेने डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या अधिकृत ईमेलवर माझी हॉस्पिटल मधील अधिकार कमी केले आहे, माझा पगार कपात केला जातो वगैरे त्यामुळे मी आत्महत्या करणार असून त्यामध्ये डॉक्टर वळसनकर यांचे नाव घेणार आहे अशा आशयाचा मेल पाठवला होता. त्यानंतर डॉक्टर शिरीष वळसनकर व त्यांच्या पत्नीने त्या महिलेस हॉस्पिटलमध्ये बोलावून घेऊन समजावून सांगितले त्यानंतर त्या महिलेने सांगून माफी मागितले व पत्र फाडून टाकले होते अशीही माहिती आज सोलापूर कोर्टात सांगण्यात आली.

Web Title: Dr. Shirish Valsangkar suicide case; Note found, reason for suicide come to light?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.