हुंडा नकोय, टीव्ही, फ्रीजसह महागड्या वस्तू तेवढ्या रुखवतात द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 06:43 PM2022-05-06T18:43:41+5:302022-05-06T18:46:21+5:30

कोट-सध्याच्या काळात लग्नात देण्यात येणाऱ्या अनेक वस्तूंच्या किमती या वाढलेल्या आहेत

Don't buy dowry, keep expensive items including TV, fridge as much as possible | हुंडा नकोय, टीव्ही, फ्रीजसह महागड्या वस्तू तेवढ्या रुखवतात द्या

हुंडा नकोय, टीव्ही, फ्रीजसह महागड्या वस्तू तेवढ्या रुखवतात द्या

googlenewsNext

लक्ष्मण कांबळे

कुर्डूवाडी : सध्याच्या युगात पूर्वीपेक्षा रोख स्वरूपात हुंडा घेणाऱ्यांची संख्या तुलनेने घटली असली तरी लग्नात नवऱ्या मुलाला टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, सोफा सेट, कूलर, ए.सी., दुचाकी आदी वस्तू देण्याची व मागण्याची चढाओढ मात्र समाजातील सर्व स्तरातून दिसून येत आहे. या वस्तूंचे दरही कोरोनानंतरच्या काळातही यंदा महागल्याने वधूपित्याचा खर्च मुलीच्या लग्नात मात्र जोरात वाढला आहे. महागड्या वस्तूंऐवजी रोख स्वरूपात वरदक्षिणाच दिलेला बरा, अशी म्हणण्याची वेळ वधूपित्यावर आली आहे.

# मे महिन्यातील विवाह मुहूर्त- ४, १०, १३, १४, १८, २०, २१, २२, २५, २६, २७

# हुंडा नको, एवढे साहित्य द्या- टीव्ही, फ्रीज, कूलर, वाशिंग मशीन, सोफा सेट, ए.सी., दिवाण, महागडा भांडी सेट, विशेषतः तांब्याच्या भांड्यांचा सेट, आरो, दुचाकी गाडी, सुवर्ण अलंकार, उंची दर्जाची वस्त्रं, शोकेस कपाट, गृह सजावटीसाठीच्या महागड्या वस्तू,

# लग्न खर्च २५ टक्क्यांनी वाढला-लग्न समारंभात वधूपित्याकडून वरदक्षिणा म्हणून रूढी, परंपरा व चालीरीतीनुसार सोने, चांदी, विविध महागड्या वस्तू या लग्नात भेट दिल्या जातात. यंदा या सर्व महागड्या वस्तूंचे जीएसटीसह जवळपास २५ ते ३० टक्क्यांनी दर वाढलेले आहेत. त्यामुळे हा खर्च करणे हे सर्वसामान्य मुलींच्या वडिलांना अधिकचा आर्थिक बोजा बनतो.

# टीव्हीचे दर १० टक्क्यांनी वाढले-प्रत्येक मुलीचे वडील हे आपल्या लाडक्या लेकीला लग्नात आता हमखास कलर टीव्ही देतात. सध्या टीव्हींचे प्रकार विविध असून २४ इंची ते ६५ इंची एलईडी टीव्ही देण्याची प्रथा जास्त आहे. यांच्या किमतीही १८ टक्के जीएसटीसह १० ते १५ टक्क्यांनी सध्या वाढल्या आहेत. मात्र, प्रत्येक लग्नात टीव्ही देण्याची पद्धत ही वधूपित्याकडून हमखास केली जाते.

# फ्रीजही झाला महाग-लग्नात मानमांतुक म्हणून मोठ्या रुबाबात वधूपित्याकडून मुलीच्या रुखवतात देण्यात येणारा फ्रीज सध्या महागडा बनला असून त्याच्या किमतीने अगदी गरम झाल्याचे दिसून येते. त्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांबरोबरच सिंगल डोअर, डबल डोअर, आईस मॅजिक असे एकापेक्षा एक महागडे मॉडेल्स वधूपित्याकडून घेऊन देण्याची प्रथा ही अलीकडे वाढत आहे. सर्व कंपनीच्या फ्रीजमध्ये सरासरी २० टक्के दरवाढ झालेली आहे.

कोट-सध्याच्या काळात लग्नात देण्यात येणाऱ्या अनेक वस्तूंच्या किमती या वाढलेल्या आहेत. कोरोनानंतरच्या काळात तर यात बरीच वाढ झाली आहे. तरी देखील आपल्या लाडक्या लेकीला रुखवतात इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर व महागडी भांडी देण्यास वधूपिता मागे-पुढे पाहत नाही.

- अनिल उघाडे, इलेक्ट्रॉनिक, फर्निचर व भांडी व्यापारी.

कोट- हौशेला मोल नसते,या म्हणी प्रमाणे प्रत्येक वधू पिता हा आपल्या लाडक्या लेकीच्या संसाराला लागणाऱ्या सर्व वस्तू खरेदी करताना वाढलेल्या किंमतीचा विचार न करता उच्च दर्जाचे फ्रीज,टीव्ही,कुलर,वाशिंग मशीन ,सोपासेट खरेदी करताना दिसत आहे..... विकास घोगरे,भांडी व फर्निचर व्यापारी.

................

Web Title: Don't buy dowry, keep expensive items including TV, fridge as much as possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.