स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळासाठी देणगीचा ओघ वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:49 IST2020-12-11T04:49:18+5:302020-12-11T04:49:18+5:30
तेलंगणातील पंचायत समितीचे सभापती योगेश मरशिवणे यांनी एक लाख २१ हजार रुपये, मुंबईचे स्वामीभक्त माधव पाटील, श्रद्धा पाटील यांनी ...

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळासाठी देणगीचा ओघ वाढला
तेलंगणातील पंचायत समितीचे सभापती योगेश मरशिवणे यांनी एक लाख २१ हजार रुपये, मुंबईचे स्वामीभक्त माधव पाटील, श्रद्धा पाटील यांनी एक लाख रुपये, राजेंद्र भोसले व चैताली भोसले यांनी एक लाख रुपये अशी देणगी दिली आहे.
तसेच शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी सहपरिवार श्रींच्या दर्शनासाठी अक्कलकोट दौऱ्यावर आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोल भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रहारचे जिल्हा युवक सचिव विजय माने, तालुकाध्यक्ष अमोल पाटील, प्रा. प्रकाश सुरवसे, शंकरराव व्हनमाने, सत्तार शेख, गोविंद शिंदे, शिवराज स्वामी, सागर याळवार, विकास गडदे, टिनू पाटील आदींसह स्वामीभक्त, सेवेकरी, कर्मचारी उपस्थित होते.
विविध मान्यवरांच्या भेटी
मागील आठवड्यात स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास चांदेवलीचे आमदार दिलीपराव लांडे, बँक ऑफ इंडिया सोलापूरचे उपविभागीय अधिकारी रामबाबू बुल्ला, मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन पोतदार, पिंपरी चिंचवडचे उद्योगपती चंद्रहास वाल्हेकर, राजाराम वाल्हेकर, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, पुणेचे नगररचना सहसंचालक सुनील मरळे, युवराज माळगे यांनी भेट देऊन दर्शन घेतले.