शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

... खांद्यावर बसायची अपेक्षा करु नका ! सोलापूरातील यंत्रमागधारकांना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 13:21 IST

केंद्र शासनाच्या वतीने यंत्रमाग उद्योगासाठी उभारण्यात येणाºया मेगा क्लस्टरसाठी जिल्ह्यातील यंत्रमागधारकांनी कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील जागा जवळजवळ निश्चित केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले या जमिनीची पाहणीही करणार आहेत.

ठळक मुद्देसर्व काही शासन करेल, अशी अपेक्षा ठेवू नका : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसलेयंत्रमाग क्लस्टर स्थापन करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे सुमारे नव्वद सदस्य क्लस्टर योजनेसाठी प्रत्येकी दहा लाख रुपये देण्यास तयार असल्याचे अध्यक्ष गोसावी यांनी सांगितले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १३  : केंद्र शासनाच्या वतीने यंत्रमाग उद्योगासाठी उभारण्यात येणाºया मेगा क्लस्टरसाठी जिल्ह्यातील यंत्रमागधारकांनी कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील जागा जवळजवळ निश्चित केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले या जमिनीची पाहणीही करणार आहेत. दरम्यान,  याबाबत झालेल्या बैठकीत कुंभारी येथील जमिनीचा रुपांतरित कर शासनानेच भरावा, अशी मागणी केली. पाणीपुरवठा दराच्या मुद्यावरुनही कुजबूज केली. त्यावर, ‘जत्रा बघायला हात धरुन नेतोय, खांद्यावर बसायची अपेक्षा करु नका’, अशा शब्दात जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी फटकारले. सर्व काही शासन करेल, अशी अपेक्षा ठेवू नका, असेही त्यांनी सांगितले. यंत्रमाग क्लस्टर स्थापन करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली.  या बैठकीला सोलापूर जिल्हा यंत्रमाग संघटना आणि टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन पदाधिकाºयांसह वस्त्रोद्योग विभागाचे उपसंचालक किरण सोनवणे, सल्लागार चेतन भट्टड, वस्त्रोद्योग विभागाचे उपसंचालक शिवकुमार, सहायक संचालक शेख, यंत्रमाग संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, राजू राठी, टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश गोसावी, मल्लिकार्जुन कमटम, गोविंद झंवर, गोविंद बुरा, नरसय्या वडनाल, अंबादास बिंगी, अमर पाटील आदी उपस्थित होते.या बैठकीस क्लस्टर योजनेच्या प्राथमिक संकल्पना अहवालास मान्यता देण्यात आली. या अहवालानुसार पुढील आवश्यक प्रशासकीय कामकाज गतीने व्हावे यासाठी पाठपुरावा केला जावा. आवश्यक त्या मंजुºया आणि कागदोपत्री कामकाज पूर्ण केले जावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या.----------------------प्रत्येकी दहा लाख रुपये देण्यास सदस्य तयार- टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे सुमारे नव्वद सदस्य क्लस्टर योजनेसाठी प्रत्येकी दहा लाख रुपये देण्यास तयार असल्याचे अध्यक्ष गोसावी यांनी सांगितले. यंत्रमाग संघटनेचे राजू राठी यांनीही सदस्य निधी देण्यास तयार असल्याचे सांगितले. मात्र क्लस्टरसाठी आवश्यक असणारी बारा एकर जागा अद्याप निश्चित झाली नसल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. भविष्यातील विस्तार, पाण्याची उपलब्धता, वाहतुकीस सोयीस्कर आणि कामगारांची उपलब्धता याचा विचार करून जागा निश्चित करावी, असे भोसले यांनी सांगितले.--------------रात्री केली जागेची पाहणी- मेगा क्लस्टर हा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अजेंड्यावरचा विषय आहे. यंत्रमागधारकांना हवी ती जागा देण्यासही ते तयार आहेत. यापूर्वी प्रशासनाने कुमठे, होटगी, कुंभारी, चिंचोली येथील जागा सूचविल्या होत्या. कुमठे आणि होटगी येथे पाण्याची अडचण असल्याने ही जागा नको, असे यंत्रमागधारकांनी स्पष्टपणे सांगितले. आता त्यांनी कुंभारी येथील जागा जवळ जवळ निश्चित केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी रात्री ७.३० नंतर कुंभारी येथे जाउन जागेची पाहणी केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरTextile Industryवस्त्रोद्योग