शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

याद्यांच्या घोळामुळे सोलापुरातील कांदा अनुदान जमा होण्यास दिवाळीचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 4:29 PM

सोलापूर बाजार समितीच्या याद्यांत त्रुटी; पणन मंडळाला मिळाल्या केवळ ३७३ शेतकºयांच्या याद्या

ठळक मुद्देपणन मंडळाने आतापर्यंत ३८७ कोटींपैकी २९० कोटी रुपयांच्या याद्या आयसीआयसीआय बँकेला दिल्याजिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सोलापूर बाजार समितीच्या याद्याच मिळाल्या नाहीतशेतकºयांना कांदा अनुदानाची रक्कम दिवाळीपर्यंत मिळण्याची शक्यता कमीच

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा अनुदान यादीत मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याने त्या आॅनलाईन पाठविल्या नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील अवघ्या ३७३ शेतकºयांच्या याद्या पणन मंडळाला मिळाल्या आहेत. यामुळे  कांदा अनुदानाची आतुरतेने वाट पाहणाºया पात्र शेतकºयांना  दिवाळीपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.

दुष्काळामुळे होरपळणाºया शेतकºयांना बाजार समितीच्या दिरंगाईचा फटका बसत आहे. १६ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीतील ३२ हजार ७०७ शेतकरी कांदा अनुदानासाठी पात्र आहेत. या शेतकºयांसाठी शासनाने ३६ कोटी ७० लाख  २९ हजार ८७४  रुपये दिले आहेत. राज्यासाठी ३८७ कोटी ३० लाख ३१ हजार रुपये अनुदान पणन संचालक कार्यालयाला जमा केले आहेत. तालुक्यातील याद्या बाजार समितीने तालुका निबंधकाकडे व तालुका निबंधकांनी पणन संचालकांनी दिलेल्या साईटवर अपलोड करावयाच्या आहेत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने त्यास संमती द्यायची आहे. पणन संचालक कार्यालयाने अक्कलकोट,करमाळा, कुर्डूवाडी, माळशिरस व पंढरपूर या  बाजार समितीच्या ३७३ शेतकºयांच्या याद्या मिळाल्याचे सांगितले; मात्र बार्शीचे ४१० व सोलापूर बाजार समितीच्या ३१ हजार ९२४ शेतकºयांच्या याद्या अद्याप मिळाल्या नसल्याचे पणन मंडळ कार्यालयाकडून सांगण्यात आले.

 सोलापूर बाजार समितीच्या याद्या मिळाल्या नसल्याचे पणन मंडळ सांगत असले तरी सोलापूर शहर निबंधक नागनाथ कंजेरी यांनी मात्र याद्या आॅनलाईन केल्याचे सांगितले.

जिल्हा पातळीवर याद्यांचा घोळ सुरू असल्याने पात्र कांदा उत्पादक शेतकºयांना अनुदानासाठी तिष्ठावे लागत आहे. आॅनलाईन याद्या पुढील आठवड्यात आयसीआयसीआय बँकेला मिळाल्या नाही तर शेतकºयांचे अनुदान विधानसभा निवडणूक आचारसंहितेत अडकण्याची शक्यता आहे. असे झाले तर शेतकºयांना कांदा अनुदानाची रक्कम दिवाळीपर्यंत मिळण्याची शक्यता कमीच आहे.

२९० कोटी अनुदान वर्ग - पणन मंडळाने आतापर्यंत ३८७ कोटींपैकी २९० कोटी रुपयांच्या याद्या आयसीआयसीआय बँकेला दिल्या आहेत. या याद्यानुसार आयसीआयसीआय बँक थेट शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करणार आहे. राज्य शासन आतापर्यंत स्टेट बँक आॅफ इंडियामार्फत कोणतीही मदत शेतकºयांच्या खात्यावर जमा करत होते मात्र नव्याने आयसीआयसीआय बँकेमार्फत पैसे जमा करण्यात येत असल्याच्या कारणामुळेही अडचण येत आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सोलापूर बाजार समितीच्या याद्याच मिळाल्या नाहीत व याद्यात फार मोठ्या त्रुटी असल्याचे सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरonionकांदाgovernment schemeसरकारी योजनाAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजारagricultureशेतीFarmerशेतकरी