रेल्वेकडून दिवाळीची भेट, सोलापूर तिरूपती दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी धावणार

By रूपेश हेळवे | Updated: October 4, 2023 16:03 IST2023-10-04T16:03:05+5:302023-10-04T16:03:34+5:30

सोलापूर -लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी अधिसूचित २६ ऑक्टोंबरपर्यंत चालवण्‍यात येणार आहे.

Diwali gift from Railways, weekly special train will run between Solapur Tirupati | रेल्वेकडून दिवाळीची भेट, सोलापूर तिरूपती दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी धावणार

रेल्वेकडून दिवाळीची भेट, सोलापूर तिरूपती दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी धावणार

सोलापूर : सणासुदीच्या काळात प्रवाशांची सोय व्हावी यासाठी सोलापूर विभागातील गाड्यांना मुदत वाढ देण्यात आली आहे. याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. यात मुंबई-सोलापूर आणि सोलापूर-तिरुपती दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या असणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-सोलापूर साप्ताहिक विशेष गाडी ४ ऑक्टोंबर ते २७ डिसेंबरपर्यंत चालवण्यात येणार आहे. 

सोलापूर -लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी अधिसूचित २६ ऑक्टोंबरपर्यंत चालवण्‍यात येणार आहे. शिवाय सोलापूर-तिरुपती साप्ताहिक विशेष गाडी २८ ऑक्टोंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या विशेष गाड्यांची बुकिंग वेबसाइटवर करता येणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे कडून करण्यात आले आहे.

Web Title: Diwali gift from Railways, weekly special train will run between Solapur Tirupati