मासिक पाळीवर प्रबोधन करणाºया केत्तूरच्या दांपत्याच्या दिल्लीत डंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 03:06 PM2020-02-17T15:06:29+5:302020-02-17T15:08:57+5:30

आशा कापडी पॅडची राष्ट्रीय अहवालात निवड; जनजागृती कार्याची राष्ट्रीय अहवालात नोंद

Ditto in Delhi of Keturur couple, who is on the menstrual cycle | मासिक पाळीवर प्रबोधन करणाºया केत्तूरच्या दांपत्याच्या दिल्लीत डंका

मासिक पाळीवर प्रबोधन करणाºया केत्तूरच्या दांपत्याच्या दिल्लीत डंका

googlenewsNext
ठळक मुद्देआतातरी लोकांनी शहाणे व्हावे आणि खुलेपणाने स्त्रियांच्या प्रश्नांचा विचार करावामहिलांनी मासिक पाळीच्या अंधश्रद्धेतून बाहेर यावं तेव्हाच खरा अंत्योदय होईलस्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही देशातील २० टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली आणि शिक्षणापासून वंचित

कोर्टी : केत्तूर (ता़ करमाळा) येथील सचिन आशा सुभाष आणि शर्वरी सुरेखा अरुण या तरुण या दांपत्याने निर्माण केलेल्या ‘आशा कापडी पॅड’चा आविष्कार आणि मासिक पाळीदरम्यान येणाºया समस्यांबाबत जनजागृती केल्याच्या कार्याची राष्ट्रीय अहवालात निवड केली. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहयोगाने राष्ट्रीय सामाजिक दायित्व मंचाने ३५ राज्यांतून निवडलेल्या सामाजिक कामांमध्ये त्यांचा समावेश केला.

सचिन आशा सुभाष आणि शर्वरी सुरेखा अरुण या तरुण दांपत्याने महिलांच्या मासिक पाळीसदर्भात जनजागृती केली. देशातील ६४ टक्के महिला अजूनही मासिक पाळीच्या काळात योग्य शोषक साहित्य वापरत नाहीत. अशा महिलांपर्यंत मासिक पाळीविषयी जनजागृती करण्याचे व कापडी आशा पॅड पोहोचवण्याचे काम समाजबंध संस्था करते. पुण्यात पॅड बनवण्याचा प्रकल्प असून पुण्याबाहेरही गडचिरोली, नागपूर, मेळघाट भागात जाऊन हे काम केले जाते, असे सचिन व शर्वरी यांनी सांगितले.

अंत्योदयासाठी काम करणाºया संस्थांच्या कामावरील राष्ट्रीय अहवालाचे नुकतेच दिल्लीत उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रकाशन झाले. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही देशातील २० टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली आणि शिक्षणापासून वंचित आहे. त्यांचा विकास करायचा असेल तर सरकार आणि सामाजिक संस्थांना जबाबदारी उचलावी लागणार आहे़ त्याशिवाय अंत्योदय होणे शक्य नाही, असे उपराष्ट्रपतींनी सांगितले़

महिलांनी अंधश्रद्धेतून बाहेर पडावे 
२१ व्या शतकातही समाजाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलेल्या महिलांच्या नैसर्गिक प्रश्नांवर समाजबंध ही संस्था कार्यरत आहे़ मात्र संस्थेचा हा सन्मान नसून या स्त्री-पुरुष समतेच्या विचारांचा हा सन्मान आहे़ त्यामुळे आतातरी लोकांनी शहाणे व्हावे आणि खुलेपणाने स्त्रियांच्या प्रश्नांचा विचार करावा, महिलांनी मासिक पाळीच्या अंधश्रद्धेतून बाहेर यावं तेव्हाच खरा अंत्योदय होईल, असे समाजबांधव संस्थेच्या समुपदेशक शर्वरी सुरेखा अरुण यांनी सांगितले़

मासिक पाळी हा प्रत्येकाच्या घरातील विषय आहे, पण त्यावर खुलेपणाने बोलले जात नाही़ मात्र आम्ही याबाबत जनजागृती करीत असतो़ त्याची दखल राष्ट्रीय अहवालात केल्याचा आनंद आहे, पण जेव्हा या विषयाचा घरातील चर्चेत समावेश होईल तेव्हा अधिक आनंद होईल.
- सचिन आशा सुभाष,
समाजबंध- समन्वयक

Web Title: Ditto in Delhi of Keturur couple, who is on the menstrual cycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.