पैसे नाकारणाऱ्या शेतकऱ्याला रोख पैसे देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी खरेदी केले पपई अन् पेरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 12:52 PM2021-02-04T12:52:04+5:302021-02-04T12:52:11+5:30

शेतकऱ्याकडून दिलखुलास दुवा; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ''पिकेल ते विकेल'' योजनेचे उद्घाटन

The district collector bought papaya and peru by giving cash to the farmer who refused the money | पैसे नाकारणाऱ्या शेतकऱ्याला रोख पैसे देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी खरेदी केले पपई अन् पेरू

पैसे नाकारणाऱ्या शेतकऱ्याला रोख पैसे देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी खरेदी केले पपई अन् पेरू

Next

सोलापूर : शेती पिकांच्या विक्रीला प्रोत्साहन देणाऱ्या संत सावता माळी रयत बाजार अभियानाचे उद्घाटन बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या विक्री स्टॉलवर पपई, पेरू आणि हरभरा डहाळे विकत घेतले. खरेदीनंतर जेव्हा जिल्हाधिकारी त्यांच्या पॉकिटमधून पैसे देत होते, तेव्हा शेतकऱ्याने हात जोडून विनम्रतेने पैसे नाकारले.

जिल्हाधिकारी साहेब, तुमच्याकडून पैसे कसे घ्यायचे. आपण पैसे देऊ नका, अशी विनंती केली. शेतकऱ्याची विनंती नाकारत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हसतमुखाने पेरू, पपई आणि डहाळीचे १३० रुपये दिले. जिल्हाधिकाऱ्यांचा आग्रह पाहून शेतकऱ्याने विनम्रतेने १३० रुपये स्वीकारले. यावेळी शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. शेतकऱ्याने दिलखुलासपणे जिल्हाधिकाऱ्यांना दुवा दिली. या योजनेला असेच प्रोत्साहन मिळू दे, अशी इच्छा देखील यावेळी शेतकऱ्याने व्यक्त केली.

सोलापूर-पुणे महामार्गावर वरवडे टोलनाक्यावर बापू लोंढे यांच्या विकेल ते पिकेल योजनेतील स्टॉलचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे, तालुका कृषी अधिकारी दुरंगे, आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कल्पनेतून विकेल ते पिकेल योजना सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून बुधवारी संत सावता माळी रयत बाजार योजनेतून विकेल ते पिकेल योजना सुरू करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले,

विकेल ते पिकेल योजनेसाठी जिल्हा विकास निधीतील नावीन्यपूर्ण योजनेमधून निधीची तरतूद करू. शेतकरी ते थेट ग्राहक अशी विक्री साखळी विकसित करण्यासाठी ही योजना आहे. या योजनेतून जिल्ह्यातील सुमारे ११०० ठिकाणी शेतकऱ्यांना विविध पायाभूत सुविधा देऊ. या शेतकऱ्यांना शासकीय कार्यालये, महामार्गालगत, हौसिंग सोसायटीच्या परिसरात जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Web Title: The district collector bought papaya and peru by giving cash to the farmer who refused the money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.