माढ्यातील भाजपच्या दोन दावेदारांची एक्स्प्रेस वे वर चर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 13:00 IST2019-03-20T12:59:10+5:302019-03-20T13:00:57+5:30

सोलापूर – माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे दोन संभाव्य उमेदवार सहकार सुभाष देशमुख आणि नुकतेच माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यात बुधवारी ...

Discussion of two BJP MLA's Express Way | माढ्यातील भाजपच्या दोन दावेदारांची एक्स्प्रेस वे वर चर्चा 

माढ्यातील भाजपच्या दोन दावेदारांची एक्स्प्रेस वे वर चर्चा 

सोलापूर – माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे दोन संभाव्य उमेदवार सहकार सुभाष देशमुख आणि नुकतेच माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यात बुधवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर राजकीय स्थितीवर चर्चा झाली.

रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा बुधवारी भाजपामध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. त्यासाठी ते सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासमवेत मुंबईला रवाना झाले. यादरम्यान एक्स्प्रेस वे वर थांबल्यानंतर दोघांमध्ये राजकीय स्थितीवर चर्चा झाली. 

यावेळी राज्य शिखर बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य अविनाश महागावकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, लोकमंगल मल्टीस्टेटचे प्रमुख रोहन देशमुख, भाजपाचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, भाजपाचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Discussion of two BJP MLA's Express Way