सोलापूर बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 12:50 IST2018-07-16T12:45:25+5:302018-07-16T12:50:37+5:30

उपसभापती श्रीशैल नरोडे यांची अविरोध निवड

Dilip Mane as Chairman of Solapur Bazar Samiti | सोलापूर बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप माने

सोलापूर बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप माने

ठळक मुद्दे प्रारंभी अध्यासी अधिकारी यांनी उपस्थित संचालकांचे स्वागत केले़ सभापती व उपसभापती पदासाठी एक एक अर्ज आल्याने ही निवडणुक अविरोध घोषित

सोलापूर : येथील राज्यात दुसºया क्रमाकांची समजली जाणाºया श्री सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती माजी आमदार दिलीप माने यांची तर उपसभापती श्रीशैल नरोळे यांची अविरोध निवड करण्यात आली़

सोमवारी सकाळी ११ वाजता निवडणुक निर्णय अधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली़ प्रारंभी अध्यासी अधिकारी यांनी उपस्थित संचालकांचे स्वागत केले़ सभापती व उपसभापती पदासाठी एक एक अर्ज आल्याने ही निवडणुक अविरोध घोषित करण्यात आल्याचे सांगण्यात आले़

यावेळी संचालक जितेंद्र साठे, प्रकाश चौरेकर, प्रकाश वानकर, नामदेव गवळी, राजकुमार वाघमारे, विजया भोसले, रामप्पा चिवडशेट्टी, अमर पाटील, इंदुमती अलगोंडा, आप्पासाहेब पाटील, वसंत पाटील, बाळासाहेब शेळके, केदारनाथ उंबरजे, बसवेश्वर इटकळे, शिवानंद पुजारी आदी उपस्थित होते़ निवडीनंतर दिलीप माने यांच्या समर्थकांनी बाजार समिती आवारात जल्लोष केला़

Web Title: Dilip Mane as Chairman of Solapur Bazar Samiti