शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

सोलापूर जिल्ह्यात धुवाँधार; पूर्वेला हाहाकार, पश्चिमेला संततधार, अनेक रस्ते पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 2:33 PM

दिलासा; जिल्ह्यात भराव वाहून गेले, अक्कलकोटमध्ये दुचाकी वाहून गेली, पाचही नक्षत्रात दमदार पाऊस

ठळक मुद्देसकाळपासून मुसळधार पाऊस होत असल्याने बासलेगाव-गळोरगी रस्त्यावरील ओढा भरून पुलावरून पाणी वाहत होतेकुरनूर धरण गळोरगी, शिरवळवाडी, घोळसगाव, किरनळ्ळी येथील साठवण तलाव, हंजगी आदी गावच्या साठवण तलावात पाणीसाठा वाढण्यास सुरुवातसलग चार तास पडलेल्या पावसाने करजगी येथील जुने वाठलेले एकशे दहा वर्षांपूर्वीचे चिंचेचे   झाड उन्मळून पडले

सोलापूर: सतत पाचव्या नक्षत्रातही पावसाने दमदार हजेरी लावली. शुक्रवार व शनिवारी दुपारी जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडला. पूर्व भागातील तालुक्यात मुसळधार वृष्टी करीत हाहाकार उडवून दिला, तर पश्चिम भागातील तालुक्यात संततधार पाऊस झाला.

सकाळपर्यंत जिल्ह्यात २७० मिलिमीटर पाऊस झाला. अक्कलकोटमध्ये मुसळधार पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. सीमावर्ती भागात प्रवासी वाहतूक जीप पाण्यात अडकली. दोन दुचाकीस्वार वाहून गेले, मात्र ग्रामस्थांच्या प्रसंगावधानाने ते वाचले. सबंध जिल्ह्यात हा पाऊस सर्वदूर झाला. यामुळे बळीराजा सुखावला आहे.

आठ फूट उंचीचा  भराव गेला वाहूनचपळगाव : पुष्य नक्षत्राच्या पावसाने शुक्रवारी सकाळपासूनच चपळगाव मंडलात जोरदार हजेरी लावली. यामुळे अक्कलकोट-तुळजापूर मार्गावरील चपळगाव जवळच्या ओढ्यावरील ८ फूट उंचीचा भरावा वाहून गेला आहे. यामुळे बोरी व हरणा नदी प्रवाहित झाल्याने कुरनूर धरणाच्या जलसाठ्यात भर पडत आहे. जवळपास तीन तास पडलेल्या पावसाने चपळगाव, हन्नूर, चुंगी, पितापूर, डोंबरजवळगे, चपळगाववाडी, दहिटणे, किणी, सिंदखेड, मोट्याळ, कुरनूर आदी गावांसह पंचक्रोशीला चांगलेच झोडपले. या पावसाने नद्या, नाले, लघुप्रकल्प, मध्यम प्रकल्पासह इतर जलस्त्रोत प्रवाहित झाल्याचे पाहावयास मिळाले.

तब्बल आठ तास मुसळधार वृष्टीसोलापूर : सलग चार तास पडलेल्या पावसाने करजगी येथील जुने वाठलेले एकशे दहा वर्षांपूर्वीचे चिंचेचे   झाड उन्मळून पडले. त्यामुळे पानमंगरुळ ते करजगी रस्त्यावरची वाहतूक तब्बल सहा तास खोळंबली. ग्रामस्थांनी हे झाड रस्त्यावरून बाजूला केले. शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून करजगी, पानमंगरुळ, सुलेरजवळगे या गावात जोरदार पावसाला सुरुवात झाली. चार तास सलग पाऊस पडल्याने नद्या-नाल्यांनी पाणी वाहू लागले. 

पाणीसाठा वाढू लागलातालुक्याची वरदायिनी असलेल्या कुरनूर धरण गळोरगी, शिरवळवाडी, घोळसगाव, किरनळ्ळी येथील साठवण तलाव, हंजगी आदी गावच्या साठवण तलावात पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. तसेच तोरणी, खानापूर, गळोरगी, कोन्हाळी, मुंढेवाडी, बोरोटी बु., भोसगे, मुगळी, मराठवाडी, गुड्डेवाडी, दोड्याळ, घुंगरेगाव, बासलेगाव आदी गावातून पावसाचे पाणी ओढा वाहिल्यासारखे वाहत होते. या गावच्या परिसरातील लहान-मोठे ओढे भरून वाहिले. 

बासलेगावात दूधवाल्यास वाचवलेशुक्रवारी सकाळपासून मुसळधार पाऊस होत असल्याने बासलेगाव-गळोरगी रस्त्यावरील ओढा भरून पुलावरून पाणी वाहत होते. जकापूर येथील गवळी प्रकाश हन्नुरे (४०, रा. जकापूर) हे दूध घेऊन अक्कलकोटकडे येत होते. पाऊस सुरू असताना धाडस करून वेगाने वाहणाºया पाण्यातून दुचाकी चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेगामुळे ते खाली पडून वाहत जाताना प्रसंगावधान ओळखून बासलेगाव येथील विश्वनाथ साखरे, राम गायकवाड, सागर पाटील यांनी त्यांना वाचविले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. 

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊस