शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

मी खासदारकीचा विषय सोडून दिला होता, पण...; वाढदिवशी धैर्यशील मोहिते स्पष्टपणे बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 15:31 IST

Madha Lok Sabha: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या मोहिते पाटलांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत.

Dhairyashil Mohite Patil ( Marathi News ) : भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले धैर्यशील मोहिते पाटील हे उद्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. वाढदिवसानिमित्त आज धैर्यशील मोहिते यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. तसंच लोकसभा निवडणूक लढवण्यामागचं कारणही सांगितलं आहे. "मी तिकिटासाठी मागणी केली होती. मात्र पक्षाने तिकीट दिलं नाही. त्यानंतर मी हा विषय सोडून दिला होता. मात्र जनताच आम्हाला बसून देत नाही," असं म्हणत धैर्यशील मोहितेंनी निवडणुकीचं रणशिंग फुकलं आहे.

धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज सकाळी माळशिरस तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. यानंतर माध्यमांसोबत बोलताना ते म्हणाले की, " अनेक ठिकाणी घरं आणि गुरांच्या गोठ्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. या पावसात अनेक ठिकाणची वीज यंत्रणा उद्ध्वस्त झाली असून ही यंत्रणा लवकरात लवकर दुरुस्त न केल्यास पिण्याचा पाण्याचा आणि गुरांसाठी लागणाऱ्या पाण्याचाही प्रश्न तयार होईल. त्यामुळे ही दुरुस्ती लवकरात लवकर करावी, अशी मागणी आम्ही केली आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर मी घरी येऊन मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. या परिसरातील जनतेनं आमच्यावर खूप प्रेम केलं आहे. अनेक लोकांची तिसरी पिढी आमच्यासोबत काम करत आहे. वाढदिवसाला माझा एकच संपल्प आहे की, आजोबांनी जे काम केलं, विजयदादांनी जे काम केलं ते करण्यासाठी तेवढी शक्ती आणि बुद्धी आम्हाला मिळो, एवढीच प्रार्थना आहे."

शरद पवार उद्या मोहिते पाटलांच्या भेटीला

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या मोहिते पाटलांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. "उद्या सकाळी अकलूज इथं स्नेहभोजनासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि इतर अनेक मोठे नेते येणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर प्रेम करणारी सर्व लोकं येणार असून त्यांच्याशी चर्चा करून आम्ही आमचा राजकीय निर्णय जाहीर करू," अशी माहिती धैर्यशील मोहिते पाटलांनी दिली आहे. 

राजीनामा देताना काय म्हणाले धैर्यशील मोहिते?

धैर्यशील मोहिते पाटील यांनी नुकतंच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहीत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. "मी भारतीय जनता पार्टी, सोलापूर जिल्हा, संघटन सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच माळशिरस विधानसभा निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी माझ्याकडे आहे. या कार्यकाळात जिल्हा, मंडल कार्यकारणी, मोर्चा, प्रकोष्ठ इत्यादी संघटनात्मक रचना गठीत करून कार्यान्वित करण्याचे कार्य केले. तसेच शक्तीकेंद्र, सुपर बॉरीयर, बूथ रचनाही पूर्ण करून सक्रिय केल्या. वेळोवेळी पक्षाचे विविध कार्यक्रम आयोजीत करून संघटना व बूथच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. आपण माझ्यावर दाखविलेला विश्वास व दिलेल्या संधीबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपणास कळवू इच्छितो की, मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव, भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचा, तसेच भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा देत आहे, त्याचा स्वीकार व्हावा, ही विनंती," असं मोहिते पाटील यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.

टॅग्स :madha-pcमाढाRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकरVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलSharad Pawarशरद पवारmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४