शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या हत्येच्या कटाचे मास्टरमाईंड धैर्यशील मोहिते पाटील'; राम सातपुते यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 13:24 IST

माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा आधी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला होता. त्यानंतर आज राम सातपुते यांनी स्वतः माध्यमांसमोर येत या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली.

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी आपल्या हत्येचा कट रचला होता असा गंभीर आरोप करत, याचे मास्टरमाईंड खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील असू शकतात, असा दावा केला आहे. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

"निवडणुकीत पैसा जिंकला, माणूस..."; कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवलेंचा नवीन व्हिडीओमध्ये काय?

माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा आधी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला होता. त्यानंतर आज राम सातपुते यांनी स्वतः माध्यमांसमोर येत या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. सातपुते यांच्या मते, हा प्रकार 'कॉन्ट्रॅक्ट किलिंग'चा असून काही मारेकऱ्यांना सुपारी देण्यात आली होती.

या हत्येच्या कटाची कुणकुण लागताच पोलिसांनी सतर्कता दाखवली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पोलीस माळशिरस तालुक्यात तळ ठोकून असून, काही संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांना या कटाची आधीच माहिती मिळाली होती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला," असेही सातपुते म्हणाले.

चिठ्ठीद्वारे मुख्यमंत्र्यांना दिली माहिती

आपल्या जीविताला असलेल्या धोक्याबाबत आणि या कटात कोणाचा सहभाग असू शकतो, यासंदर्भात राम सातपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितल्याची माहिती दिली.

मोहिते पाटलांवर थेट निशाणा

"या सर्व कटाचे सूत्रधार (मास्टरमाईंड) खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील असू शकतात," असा थेट संशय राम सातपुते यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्यात सातपुते आणि मोहिते पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून येत आहे.

पोलिस तपास करत आहेत

“या प्रकरणी पोलीस खाते आणि राज्याचा गुप्तचर विभाग संयुक्तपणे चौकशी करत असून, तपासादरम्यान काही बाबी त्यांच्या निदर्शनास आल्या आहेत. काही गुप्त माहितीही मिळाल्याचे समजते,” असे सातपुते यांनी स्पष्ट केले.

“ज्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे, असे काही लोक एकत्र येऊन कट रचत असल्याचे चित्र पुढे येत आहे. माळशिरस तालुक्यातील काही लोकांचा यामध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे. संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावण्यात आले असून तपास सुरू आहे,” असे सातपुते यांनी सांगितले.

सातपुते म्हणाले, “मी एवढंच म्हटलं आहे की मोहिते–पाटील यांच्या संदर्भातील काही लोक अंगावर घालण्याचा प्रयत्न करत आहेत. माझा लढा हा पूर्णपणे संविधानिक मार्गाने सुरू आहे. लोकांचे कारखाने बुडवणारे आणि जनतेला देशोधडीला लावणारे लोक जर सर्वसामान्य घरातून आलेल्या राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचत असतील, तर आमचं नेतृत्व याची नक्कीच योग्य ती दखल घेईल.”

English
हिंदी सारांश
Web Title : Ram Satpute Alleges Mohite-Patil Masterminded Assassination Plot Against Him

Web Summary : Ex-MLA Ram Satpute accuses MP D. Mohite-Patil of plotting his murder. Satpute claims it was a contract killing, prompting a police investigation and heightened security in Malshiras. He informed CM Fadnavis and suspects political rivals are involved due to endangered political existence.
टॅग्स :ram satputeराम सातपुतेBJPभाजपाPoliceपोलिस