सिद्धेश्वर महास्वामी आश्रमातील सत्संगात अक्कलकोटचे भक्त लीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:20 AM2021-07-25T04:20:02+5:302021-07-25T04:20:02+5:30

अक्कलकोट : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळून सत्संग करता यावा म्हणून गुरू पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला विजयपूर येथील सिद्धेश्वर म्हास्वामीजींच्या आश्रमात ...

Devotees of Akkalkot attend the satsang at Siddheshwar Mahaswami Ashram | सिद्धेश्वर महास्वामी आश्रमातील सत्संगात अक्कलकोटचे भक्त लीन

सिद्धेश्वर महास्वामी आश्रमातील सत्संगात अक्कलकोटचे भक्त लीन

Next

अक्कलकोट : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळून सत्संग करता यावा म्हणून गुरू पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला विजयपूर येथील सिद्धेश्वर म्हास्वामीजींच्या आश्रमात ऑनलाइन सत्संग घडवून आणण्यात आला. या सत्संगात अक्कलकोटमधील भक्तगणांनी सहभाग नोंदविला.

देशातील मोठ्या मठांपैकी हे मुख्य पीठ आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद असल्याने अनेकांची घुसमट होत आहे. या पार्श्वभूमीवर मोकळीक मिळावी म्हणून सोनव्वा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटक राज्यात विजापूर येथील जुन्याकालीन ज्ञानयोगाश्रमात अथणी येथील डॉ. महेश तेरदाळ यांनी लिंगैक्य मल्लिकार्जुन म्हास्वामीजींचे संग्रहित, तर श्री सिद्धेश्वर म्हास्वामीजींचे ऑनलाइन लाइव्ह प्रवचन आयोजित केले होते. वर्षपूर्तीच्या माध्यमातून गुरू पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला विजापूर येथे दहा फूट अंतरावरून भक्तांना म्हास्वामीजींनी दर्शन दिले. अमेरिकेतून काही भक्त सहभागी होतात.

यावेळी सोनव्वा पाटील, डॉ. महेश तेरदाळ, धरेप्पा चिक्कोडी (अथणी), मैलारप्पा नायकर (हुबळी), सिद्धेश्वर निंबर्गी (सोलापूर), सोमशेखर मगदूम (गोकाक), ईरण्णा शिवणगी (धारवाड), सी. बी.पाटील (रायचूर), वीरण्णा हेरूर, गुरुबसू वाघोली (संख), भरमगौडा नेमगौडरू (बैलहोंगल), चान्नप्पा ख्याडगी (सुरपूर), बसवराज पट्टणशेट्टी (बागलकोट), बाबूराव रायगोंड, सोनव्वा पाटील, शांता पाटील, पार्वती अंबली, शोभा कत्ती, गंगा हिरेमठ, महादेवी गुरव (विजयपूर), शशिकला शिंगारी (मैसूर), सुजाता पाटील (संख), ज्ञानमाला जिरगल, गिरिजा पारगोंड (जमखंडी), अक्कलकोटचे विद्याधर गुरव, सतीश दरीकर, लक्ष्मी धोडमनी, भौरम्मा गुरव, रोहिणी फुलारी, श्रीमती दरीकर यांनी या उपक्रमात योगदान दिले.

----

फोटो : २४ अक्कलकोट १, २

विजापूर येथील ज्ञानयोगी आश्रमात दर्शनादरम्यान भक्तगण.

Web Title: Devotees of Akkalkot attend the satsang at Siddheshwar Mahaswami Ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.