देवेंद्र फडणवीस यांची मागणी; आमदार गोपीचंद पडळकर यांना राज्य सरकारने संरक्षण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 16:01 IST2021-11-08T16:00:47+5:302021-11-08T16:01:23+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

देवेंद्र फडणवीस यांची मागणी; आमदार गोपीचंद पडळकर यांना राज्य सरकारने संरक्षण द्या
पंढरपूर : भ्याड हल्ल्यांना मी घाबरणारे नाही. आमदार गोपीचंद पडळकर हे राज्य सरकारच्या घोटाळ्याबाबत आवाज उठवत आहेत. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी आम्ही गप्प बसणार नाही. राज्य सरकारने तात्काळ आमदार पडळकर यांना संरक्षण द्यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पालखी मार्गाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी विठ्ठलाच्या दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
पुढे ते म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर व त्यांच्या समर्थकांवर रविवारी सांगलीतील आटपाडी तालुक्यात हल्ला झाला होता. या हल्ल्याचा देवेंद्र फडणीस यांनी निषेध करत राज्य सरकारने ही जबाबदारी स्वीकारावी.
लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. परंतु राज्य सरकार भाजपा कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत सरकारच्या अशा धमक्यांना वाल्यांना आम्ही घाबरणार नाहीत. हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणीही विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी केली.