पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास हाेणार; भाविकांनो तुम्ही फक्त एवढंच करा !

By Appasaheb.patil | Published: September 18, 2022 06:47 PM2022-09-18T18:47:17+5:302022-09-18T18:47:30+5:30

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला दररोज मोठया प्रमाणात भाविक येत असतात.

Development of Pandharpur Pilgrimage; Devotees, do only this! | पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास हाेणार; भाविकांनो तुम्ही फक्त एवढंच करा !

पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास हाेणार; भाविकांनो तुम्ही फक्त एवढंच करा !

Next

सोलापूर : पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडयामध्ये समाविष्ट कामाबाबत १२ सप्टेंबर २०२२ रोजी खासदार, आमदार, मंदीर समितीचे विश्वस्त, पालखी सोहळयाचे विश्वस्त, व्यापारी प्रतिनिधी, पत्रकार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली. आराखड्याबाबत आणखी काही सूचना असतील तर लेखी स्वरूपात २६ सप्टेंबर २०२२ पर्यंत देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

आराखड्याबाबत लोकप्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी, पालखी सोहळा प्रमुख, नागरीक, व्यापारी संघटना, वारकरी, पत्रकार यांना सूचना करावयाच्या असल्यास लेखी स्वरुपात eotemple@gmail.com  व  dpodpcslpur11@gmail.com या इमेलवर २६ सप्टेंबर २०२२ पर्यत पाठवाव्यात. तसेच पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडयाची प्रत मंदिर समिती कार्यालय, तुकाराम भवन, पंढरपूर, पंढरपूर नगरपरिषद, मंगळवेढा नगरपरिषद, उपविभागीय कार्यालय अकलूज येथे अवलोकनार्थ उपलब्ध आहे. याठिकाणीही लेखी स्वरूपात सूचना देता येतील, असेही शंभरकर यांनी सांगितले आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला दररोज मोठया प्रमाणात भाविक येत असतात. त्याचबरोबर आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी या चार प्रमुख यात्रा भरतात. पंढरपूरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यादृष्टीने आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये मंदिरातील मूळ वास्तूचे जतन करुन मंदीर व मंदीर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. तसेच स्वच्छ पिण्याचे पाणी, रस्ते, वाहनतळ, शौचालये, विद्यूत विकास, पालखीतळ विकास, चंद्रभागा नदी तीरावर दोन्ही बाजूस घाटाचे बांधकाम, वारी कालावधीत गर्दी व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वीत करणे आदी बाबींचा समावेश असणार आहे.

तीर्थक्षेत्र विकास आराखडयांतर्गत नव्याने समाविष्ट करण्यात येणा-या कामाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, पालखी सोहळा प्रमुख, नागरीक, व्यापारी संघटना, वारकरी, पत्रकार यांच्या सूचनांचाही विचार करण्यात येणार आहे, असेही श्री शंभरकर यांनी सांगितले आहे. आराखड्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर विकास, पंढरपूर शहरातील विकास कामे, संत नामदेव महाराज स्मारक, संत चोखामेळा महाराज स्मारक, पालखीतळ विकास, प्रशासकीय बाबी इत्यादीचा समावेश करण्यात आला, असेही त्यांनी सांगितले आहे.

Web Title: Development of Pandharpur Pilgrimage; Devotees, do only this!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.