शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आता शनिवार अन् रविवारीही शाळा सुरु राहणार?; अजित पवारांचं शिक्षकांना महत्त्वाचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 15:01 IST

कोरोना महामारीच्या काळात राज्यातील शाळा जवळपास ७०० दिवस बंद होत्या. दोन वर्षे कोरोनामुळे विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाहीत.

सोलापूर/मुंबई: गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. मात्र आता प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्या आहेत. पण अभ्यासक्रम भरुन काढण्याचं शिक्षकांसमोर एक मोठं आव्हान उभं ठाकल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे शिक्षकांनी आता शनिवार आणि रविवारी देखील शाळा सुरु ठेवून अभ्यासक्रम भरुन काढला पाहिजे, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शिक्षकांना केलं आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी हे आवाहन केलं  आहे.

कोरोना महामारीच्या काळात राज्यातील शाळा जवळपास ७०० दिवस बंद होत्या. दोन वर्षे कोरोनामुळे विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाहीत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवर घेतला आहे. शाळा सुरू होत असल्या तरी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे बंधनकारक करण्यात आलेले नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटते त्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले की, दोन वर्षे कोरोनामुळे मुले शाळेत गेली नाहीत. मात्र ही मुलं चांगल्या,स्वच्छ व सुंदर वातावरणात शाळेला जावी, यासाठी तुम्ही स्वच्छ व सुंदर अभियान राबविले ते अतिशय कौतुकास्पद आहे.  हे अभियान मी पुणे जिल्हा व राज्यात राबविण्यासाठी सूचना करणार आहे, असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेंतर्गत ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’या उपक्रमात श्री शिवाजी विद्यालय व जुनियर कॉलेजने सहभाग नोंदवून भौतिक सुविधेसह गुणवत्तापूर्ण शिक्षण, माझी वसुंधरा अभियान, एक पद-एक वृक्ष या उपक्रमांची यशस्वीरीत्या अंमलबजावणी करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.

रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, विभागीय चेअरमन संजीव पाटील, सचिव, सहसचिव, विभागीय अधिकारी, सहायक विभागीय अधिकारी, पर्यवेक्षक यु. व्ही. रायभान, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य डॉ. विलास खांडेकर, ज्ञानोबा खबाले, शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच संजीवनी लुबाळ, उपसरपंच महादेव येळे, केंद्रप्रमुख बी. एम. जाधव, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक-पालक संघ, माजी

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSchoolशाळाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या