उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी होटगी रोड विमानतळाची करावी पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 20:32 IST2020-10-17T20:31:52+5:302020-10-17T20:32:01+5:30
केतन शहा यांचे विनंतीवजा आवाहन: सुविधा कोठे आहेत याची करावी तपासणी

उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी होटगी रोड विमानतळाची करावी पाहणी
सोलापूर: सोलापूर दौºयावर अचानकपणे आलेल्या उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी होटगीरोड विमानतळास भेट देऊन पाहणी करावी, अशी विनंती चेंबर आॅफ कॉमर्सचे मानद सचिव व उद्योजक केतन शहा यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या माहिन्यात बैठक घेऊन बोरामणी विमानतळासाठी तातडीने ५0 कोटी देण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे यापूर्वीही ५0 कोटी देण्याची घोषणा केली होती. पवार यांनी घोषीत केलेल्या ५0 कोटीत बोरामणी विमानळाची उर्वरित जागाच संपादीत होणार आहे. इतर कामे करण्यासासठी आणखी एक हजार कोटी तरी लागतील असे सांगितले जात आहे. ही कामे होण्यासाठी आणखी किमान दहावर्षे लागतील. पण सद्यस्थितीत होटगीरोडवर सर्व सुविधा उपलब्ध आहेत. या ठिकाणी तातडीने विमानसेवा सुरू होऊ शकते. याची खातरजमा करण्यासाठी स्वत: पवार यांनी विमानतळाला भेट द्यावी आणि कोणते विमानतळ सोईस्कर ठरू शकते याबाबत खातरजमा करावी असे आवाहन शहा यांनी केले आहे.
सोलापूरला होईल फायदा
होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यास आता फार खर्च येणार नाही. नाईटलॅन्डिंगची सोय वगळता सर्व सुविधा उपलब्ध आहेत. असे असताना विनाकारण बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुद्दा पुढे करून सोलापूरच्या विकासाला बाधा आणली जात आहे, असे शहा यांनी म्हटले आहे.