बिबट्याला पकडण्यासाठी सरकारकडे हेलिकॉफ्टरची मागणी; रणजितसिंह नाईक-निंबाळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 14:48 IST2020-12-09T14:47:31+5:302020-12-09T14:48:00+5:30
बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न; त्या बिबट्याला आतापर्यंत घेतले तीन बळी

बिबट्याला पकडण्यासाठी सरकारकडे हेलिकॉफ्टरची मागणी; रणजितसिंह नाईक-निंबाळकर
सोलापूर - बिबट्याला पकडण्यासाठी शासनाने हवाई सर्वेक्षण करावे, हेलिकॉफ्टर द्यावे. आपणाकडून या गोष्टी उपलब्ध होत नसतील तर आम्ही वनखात्याला हेलिकॉफ्टर देऊ, त्यासाठी लागणारी परवानगी मात्र शासनाने द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.
पुढे बोलताना रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले की, करमाळा परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याने चांगलेच थैमान घातले आहे. त्याने आतापर्यंत करमाळ्यातील तीन जणांचा बळी घेतलेला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग सर्व प्रकारे प्रयत्न करीत आहे. करमाळा तालुक्यातील नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, अन्यथा घराबाहेर पडू नये असेही आवाहन निंबाळकर यांनी केले.