अत्याचारावेळीचे व्हिडीओ डिलीट करण्यासाठी पाच लाखांची मागणी, गुन्हा दाखल 

By रूपेश हेळवे | Updated: April 4, 2023 15:27 IST2023-04-04T15:26:55+5:302023-04-04T15:27:35+5:30

घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

demand for five lakhs to delete the video of the torture a case has been registered | अत्याचारावेळीचे व्हिडीओ डिलीट करण्यासाठी पाच लाखांची मागणी, गुन्हा दाखल 

अत्याचारावेळीचे व्हिडीओ डिलीट करण्यासाठी पाच लाखांची मागणी, गुन्हा दाखल 

रुपेश हेळवे, सोलापूर : पीडित महिलेवर अत्याचारकरत त्यावेळीचे व्हिडीओ काढून, ते व्हिडीओ डिलिट करण्यासाठी पाच लाख रूपयांची मागणी करत केल्याप्रकरणी गौरीशंकर गुरण्णा वाले ( रा. सुभाष नगर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत ४२ वर्षीय पीडितेने विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पीडिता ही घरात एकटी असताना आरोपी वाले याने पीडितेच्या घरी जाऊन माझे तुझ्यावर प्रेम आहे असे सांगत तिच्यावर अत्याचार केला. शिवाय ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेसोबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्यासाठी धमकी देत व्हिडीओ डिलीट करण्यासाठी पाच लाखांची मागणी केली. शिवाय त्याने त्याच्या ओळखीतील खासगी सावकाराला घेऊन येऊन त्यांच्याकडून पाच लाख रूपये पीडितेला देण्यास सांगितले. ते पैसे आरोपी वाले याने घेतले, अशा आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: demand for five lakhs to delete the video of the torture a case has been registered