शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य न्यायाधीशांना पत्र पाठविण्याचा निर्णय

By admin | Updated: May 21, 2015 00:44 IST

खंडपीठ कृती समितीची बैठक : सहा जिल्ह्यांतील वकील उपस्थित

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी मंत्रिमंडळाने शिफारस केली आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांना पत्र पाठवून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ स्थापन व्हावे, या मागणीसाठी गेली २८ वर्षे संघटितपणे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे शासनाने ‘सर्किट बेंच’ स्थापन करण्याचा ठराव मंजूर केला आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी बुधवारी जिल्हा बार असोसिएशनच्या हॉलमध्ये समितीचे निमंत्रक अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत ‘सर्किट बेंच’चा ठराव केल्याबद्दल यावेळी मंत्रिमंडळाच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र व गोवाचे सदस्य शिवाजीराव चव्हाण यांनी कृती समितीने आंदोलनाबाबत कोणताही निर्णय तूर्त न घेता मुख्य न्यायाधीशांना पत्र देऊन निर्णयाबाबत विचारणा करावी, असे सूचविले. त्यानुसार मुख्य न्यायाधीश शहा यांना त्वरीत पत्र पाठविण्याचा ठराव करण्यात आला.दरम्यान, अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, संभाजीराव मोहिते (कराड), दिलीप नार्वेकर (सिंधुदुर्ग), किरण घाटगे (पंढरपूर), जी. एम. पाटील, बाळासाहेब शेळके, (माळशिरस) आदींनी सर्किट बेंच स्थापनेसाठी आम्ही ठामपणे कोल्हापूरचे बाजूने असल्याचे सांगितले. यावेळी के. ए. कापसे, शिवाजीराव राणे, विवेक घाटगे, पी. आर. पाटील, प्रकाश मोरे (कोल्हापूर), डी. व्ही. पाटील (सातारा), श्रीकांत जाधव (सांगली), महादेवराव आडगुळे यांची भाषणे झाली. यावेळी हेमेंद्र गोवेकर (मालवण), विलास मगदूम (कागल), जयसिंगराव पाटील (माळशिरस), वीरेश नाईक (सिंधुदुर्ग), सुभाष देसाई (पंढरपूर), शशिकिरण पाटणे (सांगोला), महेंद्र कोरे (मिरज), डी. सी. जाधव (मंगळवेढा), शरद जाधव (सांगली), अजित मोहिते, धनंजय पठाडे, संपतराव पवार, पी. बी. आंबेकर, अतुल रेंदाळे (इचलकरंजी) आदींसह कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.