नोकरीचे आमिष दाखवून युवकाला फसविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:22 IST2021-04-11T04:22:12+5:302021-04-11T04:22:12+5:30
आकाश शिंदे आणि सागर आगलावे यांची मोहोळ तालुक्यात शिरापूर येथे ओळख झाली. त्या वेळी सागर याने आकाशला मी ...

नोकरीचे आमिष दाखवून युवकाला फसविले
आकाश शिंदे आणि सागर आगलावे यांची मोहोळ तालुक्यात शिरापूर येथे ओळख झाली. त्या वेळी सागर याने आकाशला मी सीबीआयमध्ये रिपोर्टर असून गोपनीय कामानिमित्त येथे आलो आहे, असे सांगत एका वर्तमानपत्रामध्ये मोबाइल कंपनीत घरबसल्या जादा पैसे कमवा अशी जाहिरात दाखवली. त्या कंपनीत त्याला काम लावतो, असे सांगून आगलावे आणि त्याचे दोन मित्र अजय विष्णू पाटील व सचिन लवटे या तिघांनी ३१ डिसेंबर २०१९ ते ४ नोव्हेंबर २०२० या कालावधीत फोन पे व गुगल पेद्वारे ३ लाख २० हजार ८०० रुपये काढून घेतले.
दरम्यान, कुरिअरद्वारे लॅपटॉप येईल, काळजी करू नको, असे सांगितले. यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता स्वत:ची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने शिंदे यांनी मोहोळ पोलीस ठाणे गाठले. अधिक तपास पोलीस हवालदार राठोड हे करीत आहेत.