शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

गोंदवलेल्या ‘आई’ या शब्दामुळे कोल्हापूरच्या चोराला सोलापुरात पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:44 IST

सोलापूर शहर गुन्हे शाखेची कामगिरी : २७१ ग्रॅम सोन्यासहित ८ लाखांचा ऐवज जप्त

ठळक मुद्देसोलापूर शहरात भरदिवसा घरफोडीचे प्रकार घडले होतेकुमठा नाका येथे नातेवाईकांकडे जाण्यासाठी पांढºया रंगाच्या दुचाकीवरून येणार ८ लाख २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला

सोलापूर : शरीरावर गोंदवलेल्या ‘आई’ या शब्दामुळे रेल्वे बदलून सोलापुरात येऊन चोरी करणाºया कोल्हापुरातील चोरालासोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे़ त्याच्याकडून २७१ ग्रॅम सोन्यासह ८ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़ राजू उर्फ राजवीर सुभाष देसाई उर्फ नागरगोजे (वय ३२, रा़ सावंत गल्ली, उचगाव, ता़ करवीर, जि़ कोल्हापूर) या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे.

सोलापूर शहरात भरदिवसा घरफोडीचे प्रकार घडले होते़  राजू सुभाष देसाई उर्फ नागरगोजे (रा. कोल्हापूर) हा सोन्याचे दागिने विकण्याकरिता देगाव मार्गे सोलापूर शहरातून उस्मानाबादकडे जाणार आहे, पण त्यापूर्वी तो कुमठा नाका येथे नातेवाईकांकडे जाण्यासाठी पांढºया रंगाच्या दुचाकीवरून येणार आहे, अशी माहिती गुप्तहेरांकडून मिळाली़ त्याला सापळा रचून पकडले. 

राजूकडे अधिक चौकशी केली असता त्याने  सोलापूर शहरातील विविध पोलीस हद्दीमध्ये घरफोडी व वाहन चोरल्याचे कबूल केले़ आरोपी राजू याच्याकडून २७.१ तोळे सोन्याचे दागिने, ७४ हजार रुपये रोख आणि चाळीस हजार रुपये किमतीचे मोटरसायकल असा एकूण ८ लाख २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहा़ पोलीस आयुक्त अभय डोंगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शैलेश खेडकर, अशोक लोखंडे, दिलीप किर्दक, इमाम जमादार, शंकर मुळे, राजेश चव्हाण, विजयकुमार वाळके, संतोष येळे, संदीप जावळे, सचिन होटकर,  सुहास अर्जुन, सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, रणजित परिहार, सारिका लोखंडे, संजय काकडे, विजय निंबाळकर, प्रफुल्ल गायकवाड यांनी पार पाडली़ 

दुपारीच करायचा राजू चोरी- राजू देसाई हा कोल्हापूरचा सराईत गुन्हेगार आहे़ तेथे अनेक गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत़ यामुळे कोणताही गुन्हा घडला की पोलीस त्याच्यावर संशय घेत होते़ यामुळे त्याने आपला मोर्चा सोलापूरकडे वळवला़ सोलापुरात अनेक ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनांचा तपास करताना चोराच्या शरीरावर ‘आई’ असे गोंदवलेले आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली़ यावरूनच पोलिसांनी त्या चोराचा छडा लावला़ तो सोलापुरात दुपारी बारा ते तीनदरम्यानच बंद घर बघून घरफोडी करत असताना हातमोजे घालत होता़, अशी माहिती पोलीसांनी दिली़

टॅग्स :SolapurसोलापूरThiefचोरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर