सोलापूर : ‘केसा’च्या व्यापार्याला जीवे ठार मारण्याची धमकी, दोघांवर गुन्हा
By रूपेश हेळवे | Updated: March 29, 2023 15:45 IST2023-03-29T15:44:58+5:302023-03-29T15:45:17+5:30
या प्रकरणी दोन अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सोलापूर : ‘केसा’च्या व्यापार्याला जीवे ठार मारण्याची धमकी, दोघांवर गुन्हा
सोलापूर : केसांची खरेदी विक्री करणार्या व्यापार्याला जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याच्या पॅन्टच्या खिशातून दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याप्रकरणी दोघांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत विकास मारुती धनगर ( वय २७, रा. लातूर) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी विकास हे केसांची खरेदी विक्री करण्याचा व्यावसाय करतात. ते व्यावसायासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका लॉज मध्ये राहत होते. ते २८ मार्च मंगळवार रोजी ते पान खाण्यासाठी पान टपरीवर गेले असता तेथे थांबलेल्या दोन तरूणांनी धनगर यांच्याकडील पैसे पाहिले. त्यानंतर विकास हे आपल्या लॉजकडे जात असताना दोन अनोळखी इसम हे त्यांचा पिच्छा करत लॉज जवळ पोहचले.
त्यानंतर तेथे फिर्यादीला लॉजच्या खाली ओढत आणत पाच हजार रुपये दे, अशी मागणी करत पैस नाही दिला तर जीवे ठार मारून टाकतो अशी धमकी दिली. शिवाय त्यांचा गळा पकडून त्यांच्या पॅन्टच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर रिक्षाने तेथून निघून गेले. या प्रकरणी दोन अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल झाला आहे.