धाप लागल्याचं निमित्त होऊन सोलापुरात हॉटेल कामगाराचा मृत्यू

By रवींद्र देशमुख | Updated: July 25, 2023 18:25 IST2023-07-25T18:25:43+5:302023-07-25T18:25:58+5:30

धाप लागत होती म्हणून नेहमीची बीपीची गोळी घेतली. त्रास अधिकच जाणवू लागल्याने भाऊ महेश शुक्ला यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले.

Death of a hotel worker in Solapur due to inhalation, blood pressure increased | धाप लागल्याचं निमित्त होऊन सोलापुरात हॉटेल कामगाराचा मृत्यू

धाप लागल्याचं निमित्त होऊन सोलापुरात हॉटेल कामगाराचा मृत्यू

सोलापूर : श्वासोत्सवास त्रास होऊन दम लागत असल्यानं बीपीची गोळी खाल्याचं निमित्त झालं आणि हॉटेल कामगाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. धरणीधर द्वारकानाथ शुक्ला (वय- ६५, रा. चौपाड, द. कसबा, सोलापूर) असे मयत वृद्धाचे नाव आहे. यातील मयत हा गेली अनेक दिवसांपासून भागवत थिएटरजवळील वैष्णवी हॉटेलमध्ये कामास होते. सोमवारी त्यांना श्वासोत्सवास घेण्यासाठी त्रास होत होता.

धाप लागत होती म्हणून नेहमीची बीपीची गोळी घेतली. त्रास अधिकच जाणवू लागल्याने भाऊ महेश शुक्ला यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरानी त्यांची तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची सिव्हील पोलीस चौकीत नोंद झाली आहे.

Web Title: Death of a hotel worker in Solapur due to inhalation, blood pressure increased

टॅग्स :Healthआरोग्य