दारफळ सिना येथे डीडीसी बँकेच्या कर्मचार्याची आत्महत्या; माढा तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 14:00 IST2021-01-05T13:59:39+5:302021-01-05T14:00:16+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

दारफळ सिना येथे डीडीसी बँकेच्या कर्मचार्याची आत्महत्या; माढा तालुक्यातील घटना
माढा - माढा तालुक्यातील दारफळ सिना येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी अभिमान साहेबराव उबाळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे.
दारफळ ते महातपूर रस्त्यावर शिंदे व गुरव यांच्या शेताच्या बांधावर ही घटन घडली आहे. याबाबत सोमनाथ उबाळे रा. दारफळ सिना यांनी माढा पोलिसात खबर दिली आहे. कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली याबाबतचे कारण अद्याप समजू शकले नाही. माढा पोलिस तपास करीत आहेत.