शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दानम्मादेवी यात्रेला गुड्डापुरात सुरूवात

By admin | Updated: November 22, 2014 00:10 IST

भाविकांची गर्दी : कार्तिकोत्सव, पालखी उत्सव साजरा

जत : तालुक्यातील गुड्डापूर येथील दानम्मादेवी यात्रेस आज (शुक्रवार) पासून प्रारंभ झाला. यात्रा तीन दिवस चालणार आहे. आज सायंकाळी कार्तिकोत्सव व पालखी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आमदार विलासराव जगताप, आमदार लक्ष्मण सवदी (अथणी) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यात्रेसाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतून मोठ्या प्रमाणात भाविक पायी चालत आले आहेत. या भाविकांच्या भोजनाची सोय रस्त्यात ठिकठिकाणी तेथील नागरिकांनी केली आहे. कर्नाटक राज्याच्या सीमेपासून गुड्डापूरपर्यंत येणारे सर्वच रस्ते खराब असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे.देवस्थान समितीच्यावतीने व इतर नागरिकांनी यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी मोफत जेवणाची सोय केली आहे. याशिवाय व्यापारी आणि भाविकांसाठी पाणी, आरोग्य, दिवाबत्ती आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यात्रेत मेवा-मिठाई, खेळणी, पाळणे व करमणुकीच्या साधनांची दुकाने थाटली आहेत. महाराष्ट्रातील जत, सोलापूर व कर्नाटकातील अथणी, तिकोटा, विजापूर येथून जादा एसटी बसेसची सोय प्रवासी भाविकांना ये-जा करण्यासाठी करण्यात आली आहे.शनिवार, २२ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता काशी जगद्गुरू श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य यांच्याहस्ते दानम्मादेवीच्या शिखरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार आहे. कर्नाटकचे फलोत्पादनमंत्री शामनुरू शिवशंकरेप्पा, पाटबंधारेमंत्री एम. बी. पाटील व वीरण्णा अथणी उपस्थित राहणार आहेत.यात्रा कालावधित कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शांतता-सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. बाहेरून येणाऱ्या सर्वच खासगी वाहनांची तपासणी करून त्यांना प्रवेश दिला जात आहे. यात्रा कालावधित वीज वितरण कंपनीने वीज भारनियमन करू नये, अशी मागणी देवस्थान समिती अध्यक्ष चंद्रशेखर पुजारी आणि संचालक सी. आर. गोब्बी यांनी केली आहे. (वार्ताहर)गुड्डापूर येथील दानम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात झाली असून महाराष्ट्र, कर्नाटकातील लाखो भाविकांनी यात्रेला हजेरी लावली आहे.