सोलापूर : दादाश्री प्रतिष्ठानचे प्रमुख उदयशंकर पाटलांचा भाजप प्रवेश निश्चित, उद्या मुंबईत होणार पक्षप्रवेश
By Appasaheb.patil | Updated: March 20, 2023 13:01 IST2023-03-20T12:59:44+5:302023-03-20T13:01:07+5:30
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे.

सोलापूर : दादाश्री प्रतिष्ठानचे प्रमुख उदयशंकर पाटलांचा भाजप प्रवेश निश्चित, उद्या मुंबईत होणार पक्षप्रवेश
सोलापूर : दादाश्री प्रतिष्ठानचे प्रमुख उदयशंकर पाटील यांचा भारतीय जनता पार्टीतील प्रवेश निश्चित झाला असून उद्या २१ मार्च २्०२३ रोजी भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून उदय पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा हाेती. भाजपचे मिशन २०२४ चे संयाेजक आमदार श्रीकांत भारतीय आणि उदय पाटील यांची साेलापुरात एकत्र चर्चा झाली हाेती. अखेर पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला.
प्रदेश भाजपच्या मुंबई कार्यालयात २१ मार्च राेजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह कर्नाटकातील नेत्यांच्या उपस्थित पाटील यांचा प्रवेश हाेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले. उदय पाटील यांच्या प्रवेशानंतर भाजपची शहर उत्तर, साेलापूर शहर मध्य आणि साेलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.