शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

‘बाप दारू पिऊन मारायचा म्हणून शिक्षण सोडले, काम करून घर चालवले !’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 12:39 IST

ऑपरेशन मुस्कान : ६७४ मुले पालकांच्या स्वाधीन, घरच्यांच्या त्रासाला कंटाळून पलायन

ठळक मुद्देसोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कान गेल्या २५ दिवसात ६७५ मुलांना ताब्यात घेऊन पुन्हा त्यांना पालकांच्या ताब्यात

 संताजी शिंदे

सोलापूर : शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कान उपक्रमांतर्गत गेल्या २५ दिवसात ६७५ मुलांना ताब्यात घेऊन पुन्हा त्यांना पालकांच्या ताब्यात  देण्यात आले आहे. यामध्ये बाप दारू पिऊन मारायचा म्हणून शिक्षण सोडले अन्‌ काम करून घर  चालवले, अशी कबुली एका मुलाने दिली. 

मुस्कान योजनेंतर्गत पकडण्यात आलेल्यांमध्ये मुलींचाही समावेश आहे. गरिबी, वाईट संगत, प्रेमप्रकरण  आदी कारणास्तव मुले घरातून निघून जातात. मिळेल ते काम करतात.  एक १४ वर्षांखालील मुलगा अंडा आम्लेटच्या गाडीवर काम करताना आढळून आला. लहान मुलाला कामावर ठेवल्याप्रकरणी मालकावर बालकामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियमन १९८६ प्रमाणे कारवाई करण्यात  आली आहे. अशा मुलांचा आणखी शोध सुरू आहे. 

घरासाठी शाळा सोडलीआई चार घरची  धुणीभांडी करते. वडील रात्री घरी दारू पिऊन येतो आणि आईला मारहाण करतो. आम्ही रडू लागलो की, आम्हालाही मारत होता. घरात खर्च करण्यासाठी पैसे देत नाही,  शिवाय आईलाच दारूसाठी पैसे मागतो. वडील दररोज दारू पिऊन मारत असल्याने कंटाळून ७वीतून शाळा सोडली अन्‌ हॉटेलमध्ये कामाला जात आहे. मिळालेल्या पगारावर घर चालवतो शिवाय आणखी दोन लहान  बहिणी व एक भाऊ आहे  अशी व्यथा एका मुलाने मांडली. 

शिक्षण आवडत नाहीआई-वडिलांनी शाळेत घातले होते,  मात्र तेथे मन रमत नाही. शिवाय शाळा शिकू वाटत नसल्याने मुलगा वर्गात बसत नव्हता. शिक्षक आई-वडिलांकडे तक्रार करू लागले. आई-वडिलांनी मारहाण केल्याने कंटाळून  मुलगा घरातून  निघून गेला. चायनीजच्या  गाडीवर काम करू लागला. आई वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार  दिली, त्याचा शोध घेतला आणि पुन्हा पालकांच्या स्वाधीन केले. असा प्रकारही आढळून आला आहे. 

प्रेमामुळे घर सोडलेवय वर्ष अवघे १७. बालवयातच एका मुलाबरोबर प्रेम जडले. घरच्या लोकांच्या भीतीने दोघांनीही घरातून पळ काढला. आई-वडिलांनी पोलिसात तक्रार केली. त्यामुळे दोघेही घरी येण्यास तयार नाहीत. गेलेली मुलगी अद्याप आली नाही म्हणून शेवटी आई-वडिलांनी नाद  सोडून  दिला. २०२० मध्ये एकूण १३ मुली घरातून निघून गेल्या आहेत. त्यापैकी १० मुलींचा शोध लागला आहे तर  अन्य ३ मुली या अद्याप आई-वडिलांच्या घरी आल्या नाहीत. 

हरवलेल्या मुलांच्या तक्रारी वेगळ्या आहेत.  तर मुस्कान योजनेत पकडण्यात आलेली मुले वेगळी आहेत. शहरातील सात पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व्हे करून बालकामगार मुलांचा शोध घेतला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत  आणखी १५० च्या आसपास मुले सापडतील . - बजरंग साळुंखे, पोलीस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसPoliceपोलिसMissingबेपत्ता होणं