डी. एन. गायकवाड यांचे स्मारक उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:20 AM2021-04-05T04:20:17+5:302021-04-05T04:20:17+5:30

सोलापूर : सोलापूर बाजार समितीचे माजी संचालक तथा माजी सरपंच दिवंगत डी. एन. गायकवाड यांचे बक्षीहीप्परगे गावात यथोचित स्मारक ...

D. N. Gaikwad's memorial will be erected | डी. एन. गायकवाड यांचे स्मारक उभारणार

डी. एन. गायकवाड यांचे स्मारक उभारणार

Next

सोलापूर : सोलापूर बाजार समितीचे माजी संचालक तथा माजी सरपंच दिवंगत डी. एन. गायकवाड यांचे बक्षीहीप्परगे गावात यथोचित स्मारक उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला.

डी एन गायकवाड यांचे सामाजिक कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरावे या हेतूने त्यांचे स्मारक उभारण्याची संकल्पना ग्रामस्थांच्या बैठकीत मांडण्यात आली.तरुण कार्यकर्त्यांनी त्यांचा अर्धपुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली.

यानिमित्ताने डी. एन. गायकवाड स्मारक समिती स्थापन करण्यात आली. या समितीतील पदाधिकारी पुढीलप्रमाणे -

अध्यक्ष - बाबासाहेब माने, उपाध्यक्ष - गणेश दादा निकम, संतोष सलगर

सचिव - नानासाहेब जाधव (तंटामुक्त समिती अध्यक्ष), सहसचिव- गणेश शिंदे,

मुख्य मार्गदर्शक सल्लागार - अंकुश नाना माने,(माजी सरपंच), शिवाजी भाऊ निकम, शंकर यादव, नागनाथ जाधव, मनोज महाडिक, भाऊ जाधव.

डी. एन. गायकवाड यांचे प्रेरणादायी कार्य विविध माध्यमातून समोर आणत अनेकविध सामाजिक उपक्रम या स्मारक समितीच्या वतीने करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

या प्रसंगी प्राचार्य. विश्रांत गायकवाड, भीमा गायकवाड, रमेश शिवशरण, सिद्धार्थ तडसरे, बाळासाहेब गायकवाड, विश्वास निकंबे, तम्मा दुपारगुडे, मधुकर गायकवाड, शांतकुमार गायकवाड, उमाकांत सलवदे,श्रीकांत गायकवाड, रामदास सलवदे, प्रा. जय निकंबे,महेश साखरे,दिलीप शिवशरण,अजय निकंबे व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

---

०४ डीएन गायकवाड

Web Title: D. N. Gaikwad's memorial will be erected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.