पत्नीला जबरदस्तीने मित्राशी संबंध ठेवण्यास भाग पाडल्याप्रकरणी पतीसह मित्रावर गुन्हा

By रूपेश हेळवे | Updated: June 25, 2023 18:20 IST2023-06-25T18:20:35+5:302023-06-25T18:20:50+5:30

याबाबत पीडितेने विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Crime against husband and friend for forcing wife to have relationship with friend | पत्नीला जबरदस्तीने मित्राशी संबंध ठेवण्यास भाग पाडल्याप्रकरणी पतीसह मित्रावर गुन्हा

पत्नीला जबरदस्तीने मित्राशी संबंध ठेवण्यास भाग पाडल्याप्रकरणी पतीसह मित्रावर गुन्हा

सोलापूर : प्रेमाच्या जाळ्यात ओढून पीडितेशी लग्न केल्यानंतर पत्नीला मित्राशी जबरदस्तीने संबंध ठेवण्यास सांगून अत्याचार केल्याप्रकरणी पती व त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडितेने विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पीडितेची आरोपीशी २०१८ मध्ये ओळख झाली. त्यानंतर आरोपीने पीडितेशी लग्न केले. लग्नानंतर पीडितेला आपल्या कर्नाटकातील घरी नेले. तेथे पीडितेला व आरोपीच्या पत्नीने व आईने विरोध केल्यानंतर आरोपीने तिला वेगळ्या ठिकाणी रूम करून ठेवले. त्यानंतर एके दिवशी आरोपीचा मित्र पीडितेच्या घरी येऊन पीडितेशी जबरदस्ती करू लागला. तेव्हा पीडितेने आरोपीला फोन केल्यानंतर 'हमारी जमात मे ये सब चलता है, वो जैसा बोल रहा है वैसा कर' म्हणत फोन कट केला. त्यानंतर आरोपीच्या मित्राने पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर त्याने ही घटना कोणाला सांगितल्यास पीडितेला व मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, पीडिता ही सोलापुरात आल्यानंतर याबाबतची फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.
 

Web Title: Crime against husband and friend for forcing wife to have relationship with friend