अमित शहांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सोलापुरात दहन; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 13:01 IST2020-09-15T13:01:03+5:302020-09-15T13:01:22+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

अमित शहांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सोलापुरात दहन; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आक्रमक
सोलापूर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार केंद्रीय महासचिव कॉ़ सीताराम येचुरी व अन्य पुरोगामी, लोकशाहीवादी विचारवंतांवर खोटे आरोप केले़ शिवाय दिल्ली दंगल प्रकरणात नाव गोवले आणि दोषारोपपत्र दाखल केले़ याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करीत त्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे सोलापुरात दहन करण्यात आले.
मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर माजी आमदार कॉ़ नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले़ यावेळी काळे झेंडे, काळ्या फिती लावून अमित शहा व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली़ खोटे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील कॉ़ सीताराम येचुरी व अन्य पुरोगामी, लोकशाहीवादी विचारवंतांची नावे दोषारोपपत्रातून काढावीत अशी मागणी यावेळी कॉ़ नरसय्या आडम मास्तर यांनी केली़ यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.